Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy Gig Workers Insurance : स्विगीची डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी घोषणा! 25 लाख जणांना फायदा; मिळणार 10 लाखांपर्यंतचा विमा

Swiggy Gig Workers Insurance : भारतातील आघाडीचे ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म Swiggy ने आपल्या लाखो डिलिव्हरी पार्टनर्सच्या आर्थिक सुरक्षेसाठी इंडसइंड जनरल इन्शुरन्ससोबतच्या सर्वसमावेशक विमा योजनेचे नूतनीकरण केले आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २५ लाखांहून अधिक पार्टनर्सना १० लाखांचे विमा मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 03, 2026 | 01:08 PM
स्विगीची डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी घोषणा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

स्विगीची डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी घोषणा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • डिलिव्हरी पार्टनर्सची चांदी!
  • स्विगीने विमा योजनेचे केले नूतनीकरण
  • १० लाख अपघात विमा आणि उपचारांसाठी भरघोस मदत
Swiggy Gig Workers Insurance : भारतातील ऑन-डिमांड सुविधा देणारे आघाडीचे प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत डिलिव्हरी पार्टनर्ससाठी असलेल्या सर्वसमावेशक विमा योजनेचे नूतनीकरण केल्याची आज घोषणा केली. या माध्यमातून देशातील वाढत्या गिग वर्कफोर्सची आर्थिक सुरक्षितता, आरोग्यसेवांची उपलब्धता आणि सामाजिक संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही संस्थांनी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये स्विगीच्या अपघात आणि आरोग्य विमा योजनेंतर्गत 25 लाखांहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना विमा संरक्षण देण्यात आले. ( Swiggy Gig Workers Insurance ) 

IDBI बँकेचे ग्राहक सावधान! आजपासून दोन दिवस देशव्यापी संप; बँकिंग सेवांवर होणार परिणाम?

विमा योजनेअंतर्गत डिलिव्हरी पार्टनर्सना फायदा

इंडसइंड जनरल इन्शुरन्ससोबत नूतनीकरण करण्यात आलेल्या विमा योजनेअंतर्गत डिलिव्हरी पार्टनर्सना यापुढेही 10,00,000 लाख रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण, रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी 2,00,000 रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आणि कुटुंबासाठी 1,00,000 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. याशिवाय, कुटुंब विमा संरक्षण लागू असलेल्या सर्व महिला डिलिव्हरी पार्टनर्सना तसेच पुरुष डिलिव्हरी पार्टनर्सच्या पत्नींनाही प्रसूतीसाठी विमा लाभ मिळणार आहे.

मागील विमा कालावधीत प्रसूतीसंदर्भातील एकूण विमा दाव्यांपैकी 75 टक्के दावे डिलिव्हरी पार्टनर्सच्या पत्नींनी केले होते, तर उर्वरित 25 टक्के लाभ स्विगीच्या महिला डिलिव्हरी पार्टनर्सनी घेतला होता.

स्विगीच्या सर्व सक्रिय डिलिव्हरी पार्टनर्सना संरक्षण

नूतनीकरण करण्यात आलेल्या विमा पॉलिसीद्वारे स्विगीच्या सर्व सक्रिय डिलिव्हरी पार्टनर्सना अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ठराविक रक्कम दिली जाणार आहे. तसेच अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचाही समावेश आहे. याशिवाय, या विमा पॉलिसीमध्ये रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी कॅशलेस आणि खर्चाच्या परताव्याची सुविधा, डे-केअर उपचार, प्रसूतीसाठी विमा संरक्षण आणि बाह्यरुग्ण विभागातील उपचारांसाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे.

पहिल्या दिवसापासून विमा संरक्षण

विशेष म्हणजे, आधीपासून असलेल्या आजारांनाही पहिल्या दिवसापासून विमा संरक्षण मिळणार असून, त्यासाठी कोणताही प्रतीक्षा कालावधी असणार नाही. डिलिव्हरी पार्टनर्सना स्विगी डिलिव्हरी पार्टनर ॲपच्या माध्यमातून विम्याचे लाभ सहजपणे मिळवता येणार असून, विमा दावाही दाखल करता येणार आहे.

सर्वसमावेशक सुरक्षा योजनांपैकी एक

या उपक्रमाबाबत बोलताना स्विगीच्या फूड मार्केटप्लेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव गोयल म्हणाले, “स्विगीची डिलिव्हरी पार्टनर्ससाठी असलेली विमा योजना आता भारतातील गिग इकॉनॉमीमधील सर्वसमावेशक सुरक्षा योजनांपैकी एक बनली आहे. गेल्या वर्षी आमच्या लाखो डिलिव्हरी पार्टनर्सना या विमा योजनेचा लाभ मिळाला. डिलिव्हरी पार्टनर्ससाठी अधिक लाभांसह या विमा योजनेचे नूतनीकरण करून, गरजेच्या वेळी त्यांना आर्थिक सुरक्षा आणि आरोग्यविषयक संरक्षण मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे”.

“इंडसइंड जनरल इन्शुरन्ससोबतची भागीदारी पुढेही कायम ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. या माध्यमातून डिलिव्हरी पार्टनर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारे सहाय्य अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे.”

विविध सुविधांचाही समावेश

आरोग्य आणि रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासंदर्भातील विमा लाभांमध्ये नेटवर्क आणि नॉन-नेटवर्क अशा दोन्ही प्रकारच्या आरोग्यसेवा संस्थांमधील डे-केअर उपचारांचा संपूर्ण विमा रकमेपर्यंत समावेश आहे. याशिवाय, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचे संरक्षण, कोणत्याही उपमर्यादेशिवाय 10,000 रुपयांपर्यंतचे बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) उपचार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि डिस्चार्जनंतरच्या उपचारांचा खर्च, कामावर अनुपस्थित राहिल्यामुळे होणाऱ्या उत्पन्नाच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत आणि मोबाईल विमा अशा विविध सुविधांचाही समावेश आहे.

24 तास मोफत टेलिकन्सल्टेशनची सुविधा

इंडसइंड जनरल इन्शुरन्ससोबतच्या भागीदारीत राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत स्विगीच्या सर्व डिलिव्हरी पार्टनर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जनरल फिजिशियन तसेच सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांशी 24 तास मोफत टेलिकन्सल्टेशनची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, औषधे आणि वैद्यकीय तपासण्यांवर सवलतीच्या दरात सुविधा, आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी तसेच एआय आधारित आरोग्य व्यवस्थापन सुविधांचाही लाभ घेता येणार आहे.

आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन

विमा संरक्षणाव्यतिरिक्त, स्विगीने मागील आर्थिक वर्षात विविध शहरांमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन केले होते. या उपक्रमांना पुढे नेत, चालू आर्थिक वर्षात अशा आरोग्य आणि कल्याणविषयक उपक्रमांचा अधिक शहरांमध्ये विस्तार करण्याची स्विगीची योजना आहे. या माध्यमातून देशभरातील डिलिव्हरी पार्टनर्सना आर्थिक सुरक्षा आणि इतर कल्याणकारी सुविधांसोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक सहजपणे उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Todays Gold-Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दरात पुन्हा बदल, एका क्लिकवर जाणून घ्या आजचा भाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्विगीने कोणत्या कंपनीसोबत मिळून डिलिव्हरी पार्टनर्ससाठी विमा योजना नूतनीकरण केली?

    Ans: स्विगीने इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत मिळून या सर्वसमावेशक विमा योजनेचे नूतनीकरण केले आहे.

  • Que: विमा योजनेअंतर्गत डिलिव्हरी पार्टनर्सना नेमके काय लाभ मिळणार आहेत?

    Ans: १० लाख रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण, रुग्णालयात उपचारांसाठी २ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण आणि कुटुंबासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य व प्रसूती विमा लाभ समाविष्ट आहे.

  • Que: विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्सना काय करावे लागते?

    Ans: डिलिव्हरी पार्टनर्सना स्विगी डिलिव्हरी पार्टनर ॲपच्या माध्यमातून विम्याचे लाभ सहजपणे मिळवता येतात आणि विमा दावाही दाखल करता येतो.

Web Title: Swiggy renews comprehensive insurance for delivery partners marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • gig worker
  • Home Delivery
  • Swiggy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.