Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत 5 ते 7 डिसेंबर दरम्यान ‘इंटर डेअरी एक्स्पो’;120 हून अधिक कंपन्या होणार सहभागी

व्हीए एक्झिबिशन्स आणि इंडिया डेअरी असोसिएशन (पश्चिम झोन) यांच्या सहकार्याने 5 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ‘इंटर डेअरी एक्स्पो 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 28, 2024 | 07:48 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील दुग्धव्यवसायाने मागील दशकात उत्तम प्रगती केली आहे. प्रगतीचा हा आलेख असा सुरू राहावा यासाठी व्हीए एक्झिबिशन्स आणि इंडिया डेअरी असोसिएशन (पश्चिम झोन) यांच्या सहकार्याने 5 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ‘इंटर डेअरी एक्स्पो 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात या क्षेत्रातील संपूर्ण पुरवठा साखळीशी संबंधित घटक पाहता येणार असून दुग्धव्यवसायातील नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. टिकाऊ तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळतील. या प्रदर्शनात 120 हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी होतील.

भारतात 230.58 दशलक्ष मेट्रिक टन इतके विक्रमी दुग्धोत्पादन

सध्या, भारत हा जगातील सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश आहे. जागतिक पातळीवर होणाऱ्या एकूण दूध उत्पादनापैकी 24% दुग्धोत्पादन भारतात होते. 2023-24 या वर्षात भारतात 230.58 दशलक्ष मेट्रिक टन इतके विक्रमी दुग्धोत्पादन झाले. चीनच्या तुलनेने हे तिप्पट आहे. भारतीय दुग्धक्षेत्र बाजारपेठेची उलाढाल सध्या अंदाजे 125 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असून यात वार्षिक 9% वाढ होऊन 2030 पर्यंत ही बाजारपेठ 230 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुग्धोत्पादनापासून ते दुग्धप्रक्रिया व पॅकेजिंगमध्ये स्वीकारण्यात आलेले तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे भारत सरकारने भारतीय दुग्धव्यवसायाला दिलेले सक्रिय पाठबळ यामुळे हे शक्य झाले आहे.

भारतीय दुग्धोत्पादन क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी म्हणाले, “दुग्धोत्पादन क्षेत्राने 80 मिलियन कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. यात प्रामुख्याने भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुग्धोत्पादन क्षेत्र हे विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे आणि देशभरातील महिला सबलीकरणामध्ये या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे.

प्रदर्शनातील उत्पादने

या  व्यापारी प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये आणि उपाययोजनांमध्ये दूध व दुग्धजन्य उत्पादने, दुग्धोत्पादन व कृषी साहित्य, पशुवैद्यकीय उपाय, प्रक्रिया व पॅकेजिंगची साधने, ऑटोमेशन व डेटा प्रक्रिया, घटक आणि अ‍ॅडिटिव्ह्ज, कोल्ड चेन व्यवस्थापन, वितरण व लॉजिस्टिक, आर्थिक सहाय्य संस्थांनी दिलेले पर्याय, हाय-प्रीसिजन लेबलिंग मशीन, डेअरी तपासणी उपकरणे, टिकाऊपणा, कार्यक्षमता व उत्पादनाची आकर्षकता सुनिश्चित करणाऱ्या पॅकेजिंगच्या उपाययोजना, तसेच दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी नवकल्पना यांचा समावेश आहे.

चर्चासत्रे आणि पुरस्कार वितरण

बी2बी एक्स्पोसोबतच इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे (पश्चिम झोन) ‘भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर असलेल्या संधी’ या विषयावर  दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. भारताने जागतिक दुग्ध बाजारपेठांमध्ये प्रवेश कसा करावा, यासाठी उत्पादन, निर्यात आणि नियामक आवश्यकतांच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाईल. उद्योगातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. 5 डिसेंबर 2024 रोजी ‘इंटर डेअरी अवॉर्ड्स 2024’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. दुग्धोत्पादन क्षेत्रात नावीन्यता, उत्कृष्टता आणि उद्योजकतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Inter dairy expo to be held in mumbai from december 5th to 7th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 07:48 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
3

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
4

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.