Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीसीएस, रिलायन्स नाही, तर ‘या’ बँकेच्या शेअरची कमाल, 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले 32 हजार कोटी!

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात गडगडला असताना देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांनी अवघ्या 5 दिवसांत सुमारे 32,000 कोटी रुपये कमावले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 04, 2024 | 09:16 PM
टीसीएस, रिलायन्स नाही, तर 'या' बँकेच्या शेअरची कमाल, 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले 32 हजार कोटी!

टीसीएस, रिलायन्स नाही, तर 'या' बँकेच्या शेअरची कमाल, 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले 32 हजार कोटी!

Follow Us
Close
Follow Us:

मागील आठवडा केवळ भारतीय शेअर बाजारासाठीच नाही तर जगभरातील शेअर बाजारांसाठी घसरणीचा ठरला आहे. भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) सेन्सेक्स निर्देशांकातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 च्या बाजार मूल्यात मोठी घसरण झाली आहे. मात्र, असे असतानाही देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांनी अवघ्या 5 दिवसांत सुमारे 32,000 कोटी रुपये कमावले आहेत.

बँकेच्या बाजारमूल्यात 32,759.37 कोटींनी वाढ

भारतीय शेअर बाजारात एकीकडे सेन्सेक्समधील टॉप 8 कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात घटले. याउलट एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार मालामाल झालेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे बँकेचे बाजारमूल्य 32,759.37 कोटी रुपयांनी वाढून, 12,63,601.40 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. एलआयसीचे मार्केट कॅप पाच दिवसांत 1,075.25 कोटींनी वाढून, 7,47,677.98 कोटींवर पोहोचले आहे.

हेही वाचा : …’या’ 76 रुपयांच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; अजूनही आहे खरेदीची संधी!

एचडीएफसी बँकेचा शेअर 1658.05 रुपयांवर

शुक्रवारी (ता.२) भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) 30 शेअरच्या सेन्सेक्समध्ये 1.08 अंकाची घसरण झाली. तो 80,981.95 अंकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टीमध्ये 1.17 टक्क्यांची घसरण होऊन, तो 24,717.70 अंकावर बंद झाला. असे असूनही एचडीएफसी बँकेच्या शेअरने गेल्या आठवड्यात जोरदार कमाई केली. शुक्रवारी बँकेचा शेअर 1.17 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे बँकेचा शेअर 1658.05 रुपयांच्या स्तरावर पोहचला.

हेही वाचा : …याला म्हणतात बिझनेस! काहीही न देता… झोमॅटोने उकळले तुमच्याकडून 83 कोटी रुपये! वाचा… कसे ते?

कंपन्यांच्या यादीत रिलायन्सचे वर्चस्व कायम

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली असली तरी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने टॉप-10 मौल्यवान कंपन्यांच्या यादीत वर्चस्व कायम राखले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप-10 मौल्यवान कंपन्यांच्या पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, LIC, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ITC यांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

Web Title: Investors earned 32 thousand crores in 5 days through shares of hdfc bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 09:14 PM

Topics:  

  • HDFC Bank
  • HDFC Bank Share

संबंधित बातम्या

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित
1

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा
2

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.