Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या काही तासांत 14 लाख कोटींची कमाई; Share Market मधील ऐतिहासिक तेजीची ‘ही’ आहेत कारणं

इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धाचा थेट परिणाम सगळ्या जगावर झालेला पाहायला मिळाला. संपूर्ण जगामध्ये मंदीचं वातावरण होतं. पण ८ एप्रिल रोजी, भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 08, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • युद्धाचा थेट परिणाम सगळ्या जगावर
  • ८ एप्रिल रोजी, भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी
  • काही मिनिटांत प्रचंड नफा
14 Lakh Crore In Just a Few Hours : इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धाचा थेट परिणाम सगळ्या जगावर झालेला पाहायला मिळाला. संपूर्ण जगामध्ये मंदीचं वातावरण होतं. पण ८ एप्रिल रोजी, भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अशी त्सुनामी आली की, बुधवार हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दिवसांपैकी एक ठरला.

US Iran War : युद्ध तर टळलं, आता महागाई पण घटणार? रुपयाच्या मजबुतीमुळे तुमच्या खिशाला होणार मोठा फायदा

ही तेजी इतकी का दिसून आली?

बीएसईचा ३०-शेअरचा बेंचमार्क निर्देशांक जवळपास २८०० अंकांनी किंवा ४ टक्क्यांनी उसळी घेऊन ७७३९२ च्या पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे, निफ्टीदेखील ८०० हून अधिक अंकांनी किंवा ३.५ टक्क्यांनी वाढून २३९३९ च्या पातळीवर पोहोचला. ही तेजी इतकी जोरदार होती की, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप सेगमेंटमध्येही ३ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली पाहायला मिळाली. पण ही तेजी इतकी का दिसून आली, नेमकी काय अशी कारणं आहेत ज्यामुळे शेअर बाजारावर इतका चांगला परिणाम झाला? समजून घेऊयात.

काही मिनिटांत प्रचंड नफा

शेअर बाजारातील या अचानक झालेल्या तेजीचा असा परिणाम झाला की, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२९ लाख कोटी रुपयांवरून ४४३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या काही मिनिटांत १४ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

शेअर बाजारातील वाढीची नेमकी कारणं काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. शेअर बाजारातील तेजीचे हे सर्वात मोठे कारण आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे आणि त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा धोका टळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमती १७ टक्क्यांहून अधिक घसरून ९५ डॉलरच्या खाली आल्या. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करत असल्याने, तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे भारतीय कंपन्यांना नफ्याची हमी मिळाली आहे. त्यामुळे याचा परिणाम सगळ्या कंपन्यांच्या शेअर्सवर तर झाला पण यामुळे कुठे तरी महागाई पण घटणार असल्याचे संकेत मिळाले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या धोरण बैठकीत रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली.
शेअर बाजारातील तेजीमध्ये शॉर्ट कव्हरिंग हा देखील एक घटक मानला जातो. बाजारात आधीच मोठी घसरण झाली होती. जसजशी सकारात्मक बातमी येऊ लागली, तसतसे ट्रेडर्सनी त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स बंद करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बाजारात वेगाने तेजी आल्याचं पाहायला मिळालं आहे.

आता ‘लालपरी’ झाली स्मार्ट! ST प्रवाशांसाठी देशातील पहिले राज्यव्यापी ‘NCMC’ कार्ड लाँच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Web Title: Investors made a profit of 14 lakh crore in just a few hours due to the sudden rise in the stock market today marathi newsz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Business News
  • Iran Israel Conflict
  • Marathi News
  • share market

संबंधित बातम्या

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!
1

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!

Ahilyanagar :  हक्काच्या शेतरस्त्यासाठी लढा, आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन
2

Ahilyanagar : हक्काच्या शेतरस्त्यासाठी लढा, आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन

Wardha News : वर्ध्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड; नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद
3

Wardha News : वर्ध्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड; नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

Parbhani News : विमानांसाठी इंधन आहे, मग शेतकऱ्यांसाठी डिझेल का नाही? पेरणीपूर्वी शेतकरी रस्त्यावर
4

Parbhani News : विमानांसाठी इंधन आहे, मग शेतकऱ्यांसाठी डिझेल का नाही? पेरणीपूर्वी शेतकरी रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.