Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War: हॉर्मुझनंतर आणखी एक धक्का? इराणची आता ‘या’वर नजर; जागतिक तेल संकट गडद होण्याची शक्यता 

इराणची नवी खुरापती जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. इराणने आता हॉर्मुझनंतर बाब अल-मंदेब बंद करण्याचा इशारा भारतासह इतर देशांना दिला असून यामुळे अनेक देशांसमोर तेल टंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 26, 2026 | 11:43 AM
Iran-Israel War: हॉर्मुझनंतर आणखी एक धक्का? इराणची आता 'या'वर नजर; जागतिक तेल संकट गडद होण्याची शक्यता 

Iran-Israel War: हॉर्मुझनंतर आणखी एक धक्का? इराणची आता 'या'वर नजर; जागतिक तेल संकट गडद होण्याची शक्यता 

Follow Us
Follow Us:
  • इराणचा अजून एक नवीन खेळी
  • हॉर्मुझनंतर बाब अल-मंदेब बंद करण्याचा दिला इशारा
  • भारतासह इतर देशांना तेल टंचाईचा करावा लागेल सामना
 

Iran-Israel War: इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून, जागतिक चर्चेत ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा विषय चर्चेत राहील. कारण हा एक अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असून ज्यातून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची आणि लाखो टन नैसर्गिक वायूची वाहतूक होते. भारताचाही ऊर्जेच्या गरजांचा मोठा भाग याच मार्गाद्वारे पूर्ण केला जातो; मात्र, इराणने सध्या या मार्गावर कडक नाकेबंदी लागू केली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिणामांशी आशियाई आणि आखाती देश आधीच झगडत असताना, इराण आता आणखी एका मार्गावर अडथळे निर्माण करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे अनेक देशांसमोर तेलाचे तीव्र संकट उभे राहू शकते.

हॉर्मुझनंतर इराणची नजर आता ‘बाब अल-मंदेब’ (Bab el-Mandeb) या सामुद्रधुनीवर खिळलेली आहे. जर अमेरिका आणि त्याचे मित्र देश त्यांच्यावर लष्करी हल्ले करणे सुरूच ठेवणार असतील किंवा आणखी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील, तर या मार्गाची नाकेबंदी करण्याचा अधिकार इराणकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इराणवर कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण किंवा हल्ला झाला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा इशारा देण्यात आला आहे.

Aditya Birla OWND! Fashion Brand: मुंबईतील तरुणांसाठी नवे फॅशन डेस्टिनेशन; भारतात OWND! चे ७५ वे स्टोअर लाँच

इराणच्या IRGC चे असे म्हणणे आहे की, ‘बाब अल-मंदेब’ सामुद्रधुनीसाठी मोठा धोका निर्माण करण्याची पूर्ण क्षमता इराणकडे आहे. ज्याप्रमाणे इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीवर अत्यंत कडक नियंत्रण आणि पाळत ठेवली आहे, त्याच पातळीचे नियंत्रण आणि पाळत ते ‘बाब अल-मंदेब’वरही ठेवू शकतात. हा मार्गही जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तेल आणि वायूचा पुरवठा करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. हॉर्मुझ बंद झाल्यामुळे जग आधीच संकटात सापडलेले असताना, जर ‘बाब अल-मंदेब’वरही नाकेबंदी लादली गेली, तर अनेक देशांना तेल आणि वायूच्या पुरवठ्याची तीव्र टंचाई भेडसावेल.

‘बाब अल-मंदेब’ हा जलमार्ग ‘तांबडा समुद्र’ आणि ‘एडनचे आखात’ यांना ‘अरबी समुद्रा’शी जोडतो. हे येमेन आणि ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ मधील दोन राष्ट्रे जिबूती आणि एरिट्रिया यांच्या दरम्यान वसलेले असून जगातील एकूण सागरी तेल आणि वायू व्यापारापैकी १२ टक्के व्यापार दरवर्षी पार पडतो. जर हा जलमार्ग देखील रोखला, तर त्याचा परिणाम जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याच्या ३० टक्क्यांवर होईल. जर इराणने हा मार्ग बंद केला तर जहाजांना लांबचा प्रवास करावा लागेल. ज्याने केवळ प्रवासाचा कालावधीच वाढणार नाही, तर मालवाहतुकीच्या खर्चातही वाढ होईल. शिवाय, सुरक्षाविषयक धोके वाढले आहेत; कारण येमेनमधील ‘हौथी’ बंडखोरांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

Hormuz Strait crisis: भारतीयांसाठी आनंदाची बातमी! IRGC कडून मंजुरी मिळताच ‘या’ २ जहाजांना मिळाली परवानगी; LPG टंचाई होणार कमी?

या मार्गावर हौथी हल्ल्यांपासून जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यापूर्वीच अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत; तसेच, अशा घटनांमध्ये चार जहाजे बुडाल्याचेही माहिती आहे. इतका प्रचंड खर्च करूनही, काहीच फायदा झाला आहे. आता त्यातच, जर इराणनेही या जलमार्ग बंद केला, तर परिस्थिती आणखीच गंभीर होऊ शकते. तथापि, होर्मुझमधील परिस्थितीनंतर जर या जलमार्गावरही बंदी आली, तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम अधिकच तीव्र स्वरूपात भोगावे लागतील.

Web Title: Irans warning to close bab al mandeb after hormuz risk of oil shortage for many countries including india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • America
  • iran
  • Iran-Israel War
  • Oil Crisis

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
2

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Good News Regarding Oil Supply: सौदी अरेबियाची पाइपलाइन पुन्हा सुरू, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या
3

Good News Regarding Oil Supply: सौदी अरेबियाची पाइपलाइन पुन्हा सुरू, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
4

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.