Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Itel Reaches 15 Crore Customers : आयटेलचा विक्रम! भारतात पूर्ण केले 15 कोटी ग्राहक; 5G फोन, होम अप्लायन्सेस क्षेत्रात मोठा विस्तार

Itel Reaches 15 Crore Customers : भारतातील आघाडीच्या व्हॅल्यू-सेगमेंट ब्रँड्सपैकी एक असलेल्या ‘आयटेल’ ने देशातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासात १५ कोटी ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 04, 2026 | 07:02 PM
Itel Reaches 15 Crore Customers ( सौजन्य - सोशल मीडिया )

Itel Reaches 15 Crore Customers ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आयटेलचा विक्रम!
  • भारतात पूर्ण केले 15 कोटी ग्राहक
  • 5G फोन, होम अप्लायन्सेस क्षेत्रात मोठा विस्तार
Itel Reaches 15 Crore Customers : भारतातील आघाडीच्या व्हॅल्यू-सेगमेंट कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या ‘आयटेल’ ने देशातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासात १५ कोटी (१५० दशलक्ष) ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. छोट्या शहरांमधील पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपासून ते फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे वळणाऱ्या आणि घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढवणाऱ्या लाखो भारतीय कुटुंबांचा आयटेल हा एक अविभाज्य भाग बनला आहे. ( Itel Reaches 15 Crore Customers ) 

Swiggy Partners With EV Industry : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार! स्विगीने सुरू केली भन्नाट ई-व्ही योजना; नितीन गडकरींकडून कौतुक

काउंटरपॉइंट रिसर्चनुसार आयटेल हा ३६% मार्केट शेअरसह भारतातील नंबर १ फीचर फोन ब्रँड ठरला आहे, तर १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एकूण फोन सेगमेंटमध्ये ३४% मार्केट शेअरसह ब्रँड आघाडीवर आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादन श्रेणींमध्ये वेगाने विस्तार

आपल्या ‘मेड टू लास्ट’ या संकल्पनेला प्राधान्य देत आयटेलने केवळ मोबाईल फोनपुरते मर्यादित न राहता टीव्ही, होम अप्लायन्सेस, स्पीकर्स आणि अॅक्सेसरीज यांसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादन श्रेणींमध्ये आपला वेगाने विस्तार केला आहे. ब्रँडच्या टिकाऊपणाची साक्ष देत सिटी ३०० ५जी आणि पॉवर ८० ५जी यांसारख्या फोन्समध्ये आयपी रेटिंग आणि एमआयएल-एसटीडी प्रमाणपत्रांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय, पात्र मॉडेल्सवर १०० दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा, काउंटर-रिप्लेसमेंट कार्यक्रम आणि अ‍ॅक्वा, टफ आणि केअर या फीचर फोन इनोव्हेशन सीरिजच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सहज उपलब्ध विक्रीनंतरची सेवा आणि विश्वासार्हता प्रदान करत आहे.

आयटेलवर दाखवलेल्या अखंड विश्वासाचे प्रतीक

या विशेष टप्प्यावर बोलताना आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले की , “१५ कोटी ग्राहकांचा टप्पा म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून भारतीय कुटुंबांनी आयटेलवर दाखवलेल्या अखंड विश्वासाचे प्रतीक आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेऊन, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आकांक्षांशी जुळणारे विश्वासार्ह तसेच परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही पावती आहे”.

भारतभरातील ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त तंत्रज्ञान

“मोबाईल फोनपासून टीव्ही आणि होम अप्लायन्सेसपर्यंत भारतीय कुटुंबांच्या गरजांशी संबंधित वेगवेगळ्या उत्पादन श्रेणींमध्ये विस्तार करणे हा आमच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिला असून पुढील टप्प्यात भारतभरातील ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त तंत्रज्ञान आणि उत्तम अनुभव उपलब्ध करून देण्यावर आमचा भर कायम राहील.”

८५% ग्राहकांनी आयटेलच्या उत्पादनांना व्हॅल्यू-फॉर-मनी मानले

सायबरमीडिया रिसर्चच्या अलीकडील अभ्यासात आयटेलने स्मार्टफोन श्रेणीत ०.८६ गुण मिळवत या सेगमेंटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर स्मार्ट डिव्हाइसेस श्रेणीत ०.८८ गुण मिळवून आघाडी घेतली आहे. या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, ८५% ग्राहकांनी आयटेलच्या उत्पादनांना उत्तम व्हॅल्यू-फॉर-मनी मानले आहे, ८१% ग्राहकांनी ब्रँडची ओळख मजबूती व टिकाऊपणाशी जोडली आहे आणि ७४% ग्राहकांनी आयटेलला अत्यंत विश्वासार्ह ब्रँड मानले आहे.

देशभरात १,००० हून अधिक सर्व्हिस सेंटर्सच्या मजबूत नेटवर्कसह आयटेल आगामी काळात स्मार्टफोन्स, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसच्या श्रेणींमध्ये नवीन उत्पादने लाँच करून अधिक भारतीय कुटुंबांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Gold Silver Price Hike : अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम! झपाट्याने वाढले भाव; सोन्या-चांदीच्या दरांत विक्रमी झेप

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयटेल ब्रँपने भारतात किती ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे?

    Ans: आयटेलने आपल्या १० वर्षांच्या प्रवासात भारतात १५ कोटी (१५० दशलक्ष) ग्राहकांचा टप्पा पार केला आहे.

  • Que: काउंटरपॉइंट रिसर्चनुसार आयटेलचे बाजारात काय स्थान आहे?

    Ans: आयटेल हा ३६% मार्केट शेअरसह भारतातील नंबर १ फीचर फोन ब्रँड ठरला असून, १०, रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोन सेगमेंटमध्ये ३४% शेअरसह आघाडीवर आहे.

  • Que: आयटेल मोबाईल फोनशिवाय इतर कोणत्या श्रेणींमध्ये विस्तार करत आहे?

    Ans: मोबाईल फोनसोबतच आयटेल टीव्ही, होम अप्लायन्सेस, स्पीकर्स आणि विविध अ‍ॅक्सेसरीज या श्रेणींमध्ये आपला विस्तार करत आहे.

Web Title: Itel 15 crore customers milestone in india marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Business News
  • itel
  • itel mobile

संबंधित बातम्या

कृषी क्षेत्रात भारताचा डंका! PI Industries चे क्रांतिकारी पाऊल; Pyoxaniliprole च्या रूपाने भारताला मिळाले पहिले स्वदेशी कीटकनाशक
1

कृषी क्षेत्रात भारताचा डंका! PI Industries चे क्रांतिकारी पाऊल; Pyoxaniliprole च्या रूपाने भारताला मिळाले पहिले स्वदेशी कीटकनाशक

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम
2

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम

महाराष्ट्रात गुंतवणुकीची मोठी संधी! बंदर क्षेत्रात ७६ हजार कोटींचे करार; नितेश राणेंचे जागतिक गुंतवणूकदारांना आवाहन
3

महाराष्ट्रात गुंतवणुकीची मोठी संधी! बंदर क्षेत्रात ७६ हजार कोटींचे करार; नितेश राणेंचे जागतिक गुंतवणूकदारांना आवाहन

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
4

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.