
पीआय इंडस्ट्रीजचा ऐतिहासिक शोध! ( सौजन्य - सोशल मीडिया )
हे यश पीआय आणि भारताच्या पीक संरक्षण उद्योगासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. पायॉक्सानिलीप्रोल नवीन वैज्ञानिक शोध लावण्याची आणि स्वतःची बौद्धिक संपदा तयार करण्याची देशाची वाढती क्षमता दर्शवते.भारत विविध पिके, कृषी-हवामान परिस्थिती आणि किटकांचा बदलता प्रादुर्भाव यांमुळे जगातील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण कृषी परिसंस्था आहे. आठ दशकांहून अधिक काळ पीआयने भारतीय कृषी विद्यापीठे आणि शास्त्रज्ञांच्या सहयोगाने काम केले आहे, तसेच शेतकऱ्यांशी पिढ्यान्-पिढ्या असलेल्या संपर्कातून या गुंतागुंतीची सखोल समज विकसित केली आहे.
पायॉक्सानिलीप्रोल भारतातील शेतीच्या वास्तववादी परिस्थितीची ही समज आणि पीआयच्या प्रगत वैज्ञानिक शोध क्षमतेला एकत्र आणते. जागतिक वैज्ञानिक मानकांनुसार विकसित केलेल्या या रेणूचे भारतातील कृषी परिस्थितीनुसार सखोल मूल्यांकन करण्यात आले आहे, ज्यामध्ये राज्य कृषी विद्यापीठांसह भारताच्या कृषी संशोधन परिसंस्थेच्या सहभागाने विविध ठिकाणी शेतातील चाचण्या, वैज्ञानिक मूल्यमापने आणि नियामक अभ्यासांचा समावेश आहे.
पायॉक्सानिलीप्रोलला भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडून (सीआयबीअँडआरसी) नोंदणी मिळाली आहे. समितीने अधिकृतपणे या रेणूला भारतात शोधण्यात आलेला पहिला कीटकनाशक सक्रिय घटक म्हणून मान्यता दिली आहे.
पीआय इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्हाइस चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मयंक सिंघाल म्हणाले, “दशकभरापूर्वी आम्ही भारतात मूळ पीक-संरक्षण उपायांचा शोध घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यासाठी पारंपारिक समजुतींना आव्हान देण्याचे धाडस, मोठी दीर्घकालीन गुंतवणूक आणि यापूर्वी कधीही साध्य झाले नव्हते ते साध्य करण्याचा ठाम विश्वास आवश्यक होता. आज पायॉक्सानिलीप्रोल सिद्ध करते की, भारतातील शेतीविषयी आमची सखोल समज आणि जागतिक दर्जाचे विज्ञान यांचा संगम होतो, तेव्हा काय शक्य होऊ शकते”.
“हा पीआयसाठी आणि भारतीय कृषी नाविन्यतांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे यश भारतामधून जगासाठी मूळ विज्ञान आणि बौद्धिक संपदा निर्माण करणारी जागतिक, नाविन्यता-केंद्रित लाइफ सायन्सेस कंपनी उभारण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेला अधिक पाठबळ देते.”
हा शोध मॉलिक्युलर डिस्कव्हरी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, फॉर्म्युलेशन सायन्स, टॉक्सिकॉलॉजी, अॅग्रोनॉमी, प्रोसेस डेव्हलपमेंट आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये पसरलेल्या एकात्मिक संशोधन आणि विकास परिसंस्थेतील पीआयची दीर्घकालीन गुंतवणूक दर्शवतो. ७०० हून अधिक शास्त्रज्ञ, २०० हून अधिक पीएचडी धारक आणि २६० हून अधिक पेटंट्सच्या पोर्टफोलिओसह पीआयने मूळ शोधांचा विकास आणि त्यांचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक सखोलता व पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.
पायॉक्सानिलीप्रोलचे महत्त्व केवळ एका रेणूपुरते मर्यादित नाही. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि बायोकेमिकल उपायांचा समावेश असलेल्या पीआयच्या व्यापक इनोव्हेशन पाइपलाइनचा हा पहिला परिणाम आहे. एकत्रितपणे, हे भारताच्या वैज्ञानिक स्वावलंबनाच्या प्रवासातील महत्त्वाचे पाऊल आहे, जे स्वदेशी संशोधन क्षमतांना अधिक दृढ करते आणि जागतिक पातळीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय कृषी नाविन्यतांना संधी निर्माण करून देते.
पीआय इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन नारायण के. शेषाद्री म्हणाले, “पायॉक्सानिलीप्रोल भारतीय कृषी विज्ञानाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकारच्या क्रांतिकारी नाविन्यतेसाठी प्रस्थापित चौकटीच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता, वैज्ञानिक सामर्थ्याची जोड, संयमी गुंतवणूक आणि दीर्घकालीन कटिबद्धतेची गरज असते. पीआय इंडस्ट्रीजसाठी पायॉक्सानिलीप्रोल नेक्स्ट-जनरेशन शोधांसाठी प्रबळ पाया ठरले आहे. हे सातत्यपूर्ण इनोव्हेशन पाइपलाइन उभारण्यासाठी, स्वदेशी संशोधन क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आणि जागतिक कृषी क्षेत्रासाठी वेगळेपण जपणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.”
भारतातील पहिल्या स्वदेशी कीटकनाशक शोधापासून उद्याच्या भविष्यातील शोधांपर्यंत पायॉक्सानिलीप्रोल पीआय आणि भारतीय कृषी नाविन्यतांसाठी नवीन पर्व सुरू करत आहे.
Ans: भारतात पूर्णपणे स्वदेशी संशोधनातून शोधण्यात आलेला आणि तयार करण्यात आलेला देशातील पहिला अधिकृत कीटकनाशक सक्रिय घटक आहे.
Ans: हा रेणू विकसित करण्यासाठी पीआय इंडस्ट्रीजने दशकभरापेक्षा अधिक काळ मूळ संशोधन, सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि वैज्ञानिक नाविन्यता यामध्ये लावला आहे.
Ans: भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती'कडून रेणूला अधिकृत नोंदणी व मान्यता मिळाली आहे.