Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Jack Ma Success Story : जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या Alibaba चे संस्थापक Jack Ma यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षाची कहाणी थक्क करणारी आहे. शाळेत अनेकदा नापास होणे, KFC सह ३० नोकऱ्यांच्या मुलाखतींमधून नाकारले, मित्रांच्या मदतीने अलिबाबाची स्थापना करण्यापर्यंतचा त्यांचा हा खडतर प्रवास आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 10, 2026 | 04:04 PM
Jack Ma Success Story ( सौजन्य - सोशल मीडिया )

Jack Ma Success Story ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन…
  • तरीही बनला अब्जाधीश!
  • Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
Jack Ma Success Story : कोणीही कशासाठीही दिलेला नकार आपल्याला सहन होत नाही. आपण एकदा नापास झालो तरीही आपण खचून जातो. पु्न्हा प्रयत्न करण्यास नकार देतो. पण अशी काही उदाहरणं आहेत ज्यांच्या गोष्टी ऐकल्यानंतर मात्र आपण प्रयत्न करणं सोडता नये असं नक्कीच वाटून जाईल. हे व्यक्ती चीनचे दिग्गज अब्जाधीश उद्योगपती जॅक मा हे आहेत. शाळेत नापास, ३० इंटर्व्ह्यूमध्ये थेट नकार मग पुढे हाच व्यक्ती कसा बनला अब्जाधीश? काय आहे यामागची स्टोरी ? ( Jack Ma Success Story ) 

Refined Sugar असते तरी काय? बाजारातील भाव कमी करण्यासाठी कंपन्या वाढवणार पुरवठा, नेमका प्लॅन काय?

विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर आणि केएफसीसह डझनभर नोकऱ्या नाकारल्यानंतर, जॅक मा यांनी जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान साम्राज्यांपैकी एक असलेल्या ‘अलिबाबा ग्रुप’ची स्थापना केली. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता.

बऱ्याच वेळा आलं अपयश

१९६४ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे जन्मलेल्या जॅक मा पण त्यांचं जन्मनाव मा युन आहे. यांना त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षांमध्ये अनेक वेळा ते नापास झाले. त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा दोनदा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले, त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये हांगझोऊ नॉर्मल युनिव्हर्सिटीमधून इंग्रजीमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी पुढचा प्रवास सुरु केला.

३० नोकऱ्यांनाही नकार

पदवी शिक्षणानंतर, जॅक मा यांनी सुमारे ३० वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज केला आणि त्यांना सर्वत्र नकार मिळाला. स्थानिक KFC मधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या २४ इतर अर्जदारांपैकी ते एकमेव होते. १९९५ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान इंटरनेटचा शोध लागण्यापूर्वी, ते इंग्रजी शिक्षक म्हणून काम करत होते आणि महिन्याला फक्त १२ डॉलर म्हणजेच आजच्या काळातील अंदाजे ₹१,१४३ कमवायचे.

मग एक नवी सुरुवात

१९९९ मध्ये, जॅक मा यांनी हांगझोमधील त्यांच्या लहानशा अपार्टमेंटमध्ये १७ मित्र आणि माजी विद्यार्थ्यांना एकत्र येत त्यांना अलीबाबा हे बिझनेस-टू-बिझनेस मार्केटप्लेस म्हणून सुरू केली. यासाठी त्यांनी त्या सगळ्यांना अंदाजे $60,000 चे योगदान देण्यास राजी केले. तांत्रिक पार्श्वभूमी नसतानाही, जॅक मा यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाने चीनमधील लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना जागतिक स्तरावर व्यापार करण्यास मदत केली.

अलीबाबाला फंडिंग कोणी केलं?

अलीबाबाला सुरुवातीलाच भरीव फंडिंग मिळालं. ज्यामध्ये सॉफ्टबँक आणि गोल्डमन सॅक्सकडून मिळालेल्या $25 दशलक्षचा समावेश होता. यामुळे ग्राहक रिटेल ताओबाओ, टिमॉल आणि डिजिटल पेमेंट्स (अलीपे) मध्ये मोठ्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर, सप्टेंबर २०१४ मध्ये, अलीबाबाने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर $21.8 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी आयपीओसह इतिहास रचला. यामुळे जॅक मा यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आणि ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले.

लॅमलाईटपासून लांब आणि पून्हा वापसी

२०१३ मध्ये सीईओ आणि २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर, जॅक मा यांनी समाजसेवा, शिक्षण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान परिसंस्थेवर लक्ष केंद्रित केले. नियामक दबाव आणि २०२० च्या अखेरीस त्यांच्या ‘अँट ग्रुप’ या वित्तीय उपक्रमाच्या मोठ्या पुनर्रचनेनंतर, जॅक मा काही वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहिले आणि हळूहळू पुन्हा लोकांच्या नजरेसमोर येऊ लागले.

आता पेमेंट फेल नाही होणार… NPCI ने लाँच केला eNACHLite; जाणून घ्या कसं काम करते?

Web Title: Jack ma inspirational life story failures and success details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Business News
  • success tips

संबंधित बातम्या

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
1

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
2

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड
3

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा
4

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशव्यापी मोहीम! Vedanta कडून ‘संपूर्ण पोषण’ अभियानाचा प्रारंभ; 18 राज्यांतील बालकांना मिळणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.