
फोटो सौजन्य सोशल मीडिया
आतापर्यंत कंपनीने सुमारे १,५०० घरांची निर्मिती केली आहे. वसई-विरार परिसरातील प्रकल्पांसोबतच पालघर, बोईसर आणि सफाळे या भागांतही विस्तार करण्याची तयारी सुरू आहे. ‘नवराष्ट्र’शी साधलेल्या विशेष संवादात एव्ही ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित मिश्रा यांनी कंपनीचा प्रवास आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली.
एव्ही ग्रुपचे संस्थापक अमित मिश्रा यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगताना बालपण सर्वसामान्य कुटुंबात गेल्याचे नमूद केले. त्यांचे वडील वाहनचालक होते. स्वतःचा व्यवसाय उभा करून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या इच्छेतून त्यांनी एव्ही ग्रुपची सुरुवात केली. ग्राहकांना केवळ घर नव्हे, तर चांगली जीवनशैली उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सुमारे १,५०० घरांची निर्मिती करण्यात आली असून, आगामी पाच वर्षांत आणखी ५ हजार घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Mentos Fresh Action New TVC : मेंटॉस फ्रेश ॲक्शनची नवीन भन्नाट जाहिरात! पाहा ताजेपणाचा भन्नाट झटका
मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर खरेदी करताना बजेट हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे वसई-विरार परिसरात परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे. घरासोबतच रहिवाशांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रकल्पांमध्ये किराणा दुकान, मेडिकल स्टोअर आणि जिम यांसारख्या सुविधांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. तसेच बांधकामाचा दर्जा, सुरक्षितता आणि वेळेत घराचा ताबा देण्यालाही प्राधान्य दिले जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
विरार आणि परिसरात मेट्रो, विरार-अलिबाग कॉरिडॉर, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाची जोडणी आणि बुलेट ट्रेन यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे भविष्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा या परिसरातील गृहनिर्माण क्षेत्राला होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर एव्ही ग्रुपने वसई-विरारपलीकडे पालघर आणि बोईसरमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे.
सफाळे येथे सुमारे ८५ एकरांवर शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांसारख्या सुविधांचा समावेश असलेली मोठी टाउनशिप विकसित करण्याचे नियोजन आहे. याशिवाय बोरिवली, कांदिवली आणि अंधेरी येथेही प्रकल्पांच्या शक्यता तपासल्या जात आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि १० ग्रॅम सोन्याची ऑफर देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात कंपनीला आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारात आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.