
एक दोन नाही तर थेट 6 सिलेंडर मिळणार फ्री ( सौजन्य - सोशल मीडिया )
जम्मू आणि काश्मीर विधानसभेत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री सतीश शर्मा यांनी या योजनेची घोषणा केली. ‘अंत्योदय अन्न योजना’ (AAY) अंतर्गत समाविष्ट असलेल्या अत्यंत गरीब कुटुंबांना वर्षाला ६ गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने या धोरणाला अधिकृत मंजुरी दिली असून, लवकरच या संदर्भातील प्रशासकीय आदेश जारी केले जातील.
विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात महागडा गॅस मिळतो. लेहमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल १,१७९ रुपये तर व्यावसायिक सिलिंडर ३,३८५.५० रुपयांना मिळतो. त्यामुळे अशा काळात ही मोफत सिलिंडरची योजना तेथील गरिबांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
शासनाने ६ मोफत सिलिंडरची घोषणा केल्यानंतर विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वर्षाला १२ मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते, मग आता ६ च का? असा सवाल भाजप आमदारांनी उपस्थित केला. यावर, “निवडणुकीतील सर्व आश्वासने ५ वर्षांच्या कार्यकाळात टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील,” असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.