Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Jio IPO Grey Market Premium : Jio च्या आगामी IPO ची शेअर बाजारात तुफान चर्चा सुरू आहे. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचा प्रीमियम तब्बल ₹१७० वर पोहोचला आहे. आयपीओ लाँच होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांकडून मिळणाऱ्या या उदंड प्रतिसादामुळे प्राथमिक शेअर बाजारात मोठ्या कमाईची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 04:15 PM
Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ!
  • GMP थेट ₹170 वर
  • जाणून घ्या कधी होणार लाँच?
Jio IPO Grey Market Premium : रिलायन्स इंडस्ट्रीज RIL ची डिजिटल शाखा असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मेगा आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. IPO यायच्या अगोदरच त्याच्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने अद्याप प्राईस बँड जाहीर केलेला नाही, तसेच अधिकृत लॉन्चची तारीखही निश्चित झालेली नाही. असे असूनही, ग्रे मार्केटमध्ये त्याला मोठी मागणी आहे. नेमकं काय घडतंय मार्केटमध्ये? ( Jio IPO Grey Market Premium ) 

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक खरेदीला गती

IPOWatch च्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिओ प्लॅटफॉर्म्सचा GMP १७० रुपयांपर्यंत वाढला. यावरून गुंतवणूकदारांमध्ये त्याच्या शेअर्सना असलेली प्रचंड मागणी दिसून येते. या शेअरने अनलिस्टेड मार्केटमध्ये ₹१२०-₹१२५ च्या प्रीमियमवर एन्ट्री केली. काही दिवसांनंतर, तो ₹१४०-₹१४५ च्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. त्यानंतर काही दिवसांनी, एक-दोन दिवसांपूर्वी तो सुमारे ₹१६०-₹१६७ पर्यंत वाढला आणि आता ₹१७० च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. इतका त्याचा क्रेझ आहे.

देशातील सर्वात मोठा IPO

जिओ IPO बद्दल बाजारात बरीच चर्चा आहे. असे वृत्त आहे की, कंपनी अंदाजे २७० दशलक्ष नवीन शेअर्स जारी करून या आयपीओद्वारे ₹३२,००० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. असंही वृत्त आहे की, त्याच्या शेअर्ससाठी प्राईस बँड ₹१,३००-₹१,४५० दरम्यान असू शकतो. पण याला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. जागतिक गुंतवणूक बँकर्सच्या अंदाजानुसार कंपनीचे मूल्यांकन अंदाजे ₹१७० अब्ज म्हणजेच ₹११ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. जर जिओ या मूल्यांकनावर सूचीबद्ध झाली, तर ती देशातील २-३ सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक ठरणार आहे.

कधी उघडणार हा IPO?

माध्यमांच्या वृत्तानुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा मेगा आयपीओ या महिन्यात, ऑक्टोबर २०२६ मध्ये लॉन्च होणार आहे. असे वृत्त आहे की, तो १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला होईल, तर किरकोळ गुंतवणूकदारांना २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान बोली लावण्याची संधी मिळेल. कंपनी १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सेबीकडे आपला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस RHP सादर करेल अशी अपेक्षा आहे. आयपीओनंतर कंपनीच्या शेअर्सची सूचीकरण २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे.

( Desclaimer : हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. )

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न

Web Title: Jio ipo grey market premium reaches 170 check opening date details marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • IPO News
  • jio
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
1

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
2

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
3

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली
4

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.