Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Jio Users Alert: सध्या सोशल मीडियावर जिओ यूजर्सना मिळालेल्या मेसेजची जोरदार चर्चा सुरु आहे. टिपस्टर अभिषेक यादवने देखील सोशल मीडिया एक्सवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 11:21 AM
Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • जिओ प्रीपेड यूजर्सना मोठा धक्का
  • मेसेज अलर्टमुळे यूजर्सची चिंता प्रचंड वाढली
  • रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर जिओ एसएमएस आणि इनकमिंग कॉल्स बंद करणार?
तुम्ही देखील जिओ यूजर आहात का? तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जिओचे प्रीपेड सिमकार्ड वापरणाऱ्या अनेक यूजर्सना जिओ कंपनीच्या नावाने एक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमुळे सर्वच प्रीपेड यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. मेसेजममध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ‘तुमचा रिचार्ज प्लॅन संपला आहे आणि इनकमिंग कॉल्स कधीही बंद होऊ शकतात.’ हा मेसेज अलर्ट मोजक्याच जिओ यूजर्सना पाठवण्यात आला आहे. मात्र या मेसेज अलर्टमुळे यूजर्सची चिंता प्रचंड वाढली आहे. याबाबत यूजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यास देखील सुरुवात केली आहे.

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

अभिषेक यादवने शेअर केली एक्स पोस्ट

अभिषेक यादव या टिपस्टरने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जिओकडून आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, ‘Your Jio recharge plan has expired. Incoming calls may stop anytime soon. Recharge now to stay connected.’ याचा अर्थ असा आहे की, तुमचा जिओ रिचार्ज प्लॅन संपला आहे. इनकमिंग कॉल कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात. कनेक्टेड राहण्यासाठी आत्ताच रिचार्ज करा. ही पोस्ट शेअर करत अभिषेक यादवने म्हटलं आहे की, तुमचा रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर जिओ एसएमएस आणि इनकमिंग कॉल्स बंद करणार आहे. याबाबत यूजर्सना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

BIG: Jio will stop incoming calls and SMS after your recharge ends, users informed via SMS. 📞 #Jio #RelianceJio #TRAI — Abhishek Yadav (@yabhishekhd) November 15, 2026

कंपनीने अधिकृत वक्तव्य जारी केले नाही

कंपनीच्या नावाने आलेल्या मेसेजमध्ये इनकमिंग कॉल्स बंद होण्यासाठी कोणतीही टाईमलाईन देण्यात आली नाही. त्यामुळे रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर इनकमिंग कॉल नेमके कधीपासून बंद होणार, याबाबत संभ्रम आहे. या मेसेज अलर्टबाबत अद्याप कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नाही.

अभिषेक यादवने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, लोक जिओ वापरत असण्याचे एकमेव कारण हे होते की, रिचार्ज संपल्यानंतरही जिओवर इनकमिंग कॉल्स सुरू राहत असत; परंतु आता जिओनेही इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणेच वागायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या जिओ यूजरने म्हटलं आहे की, जर तुम्हाला इनकमिंग कॉल्स सुरू ठेवायचे असतील, तर तुम्हाला 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन करावा लागेल, जो एक वर्षासाठी किंवा काही ठराविक दिवसांसाठी वैध असेल. अशी चर्चा जिओच्या काही अधिकृत कर्मचाऱ्यांकडून पसरवली जात आहे.

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

रिचार्ज संपताच बंद होतात इनकमिंग कॉल?

सहसा, कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा प्रीपेड संपल्यानंतर सर्वात आधी केवळ आउटगोइंग कॉल आणि एसएमएस सुविधा बंद केल्या जातात. तर, यूजर्स काही काळापर्यंत इनकमिंग कॉल आणि एसएमएस रिसीव्ह करू शकतात. अशाच प्रकारे, जिओच्या वेबसाईटवर देखील प्लॅन संपल्यानंतर इनकमिंग कॉल बंद होण्यासाठी कोणतीही टाईमलाईन जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या यूजर्सना आलेल्या मेसेजमध्ये आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओ यूजर्सना कंपनीकडून कोणता मेसेज पाठवण्यात येत आहे?

    Ans: जिओच्या काही प्रीपेड यूजर्सना रिचार्ज प्लॅन संपल्याचा आणि इनकमिंग कॉल कधीही बंद होऊ शकतात, असा अलर्ट मेसेज मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Que: जिओचा रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल बंद होणार आहेत का?

    Ans: व्हायरल मेसेजनुसार इनकमिंग कॉल बंद होऊ शकतात. मात्र, नेमक्या कोणत्या वेळेनंतर कॉल बंद होतील, याची माहिती देण्यात आलेली नाही.

  • Que: जिओच्या व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटले आहे?

    Ans: 'तुमचा जिओ रिचार्ज प्लॅन संपला आहे. इनकमिंग कॉल कधीही बंद होऊ शकतात. सेवा सुरू ठेवण्यासाठी त्वरित रिचार्ज करा,' असा मेसेज पाठवण्यात आल्याचा दावा आहे.

Web Title: Jio users alert incoming calls may stop anytime after recharge expiry viral sms creates concern hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple चाहत्यांनो तयार राहा!  2027 मध्ये येणार iPhone चे 3 नवे मॉडेल्स, डिव्हाईसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स
1

Apple चाहत्यांनो तयार राहा! 2027 मध्ये येणार iPhone चे 3 नवे मॉडेल्स, डिव्हाईसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई
2

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! ‘हे’ 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय
3

Gadgets Gift Ideas: मित्रांना द्या हटके सरप्राइज! ‘हे’ 5 भन्नाट गॅजेट्स ठरतील बेस्ट पर्याय

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी
4

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.