
JSW Paints कडून 'अक्झो नोबेल इंडिया' अधिग्रहण पूर्ण; तब्बल ६१.२ टक्के हिस्सा आता...
जेएसडब्ल्यू पेंट्सकडून अक्झो नोबेल इंडिया अधिग्रहण पूर्ण
जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी
जेएसडब्ल्यू पेंट्सने संपादित केले ०.४४% भागभांडवल
पुणे: जेएसडब्ल्यू पेंट्स लिमिटेडने (जेएसडब्ल्यू पेंट्स) आज अक्झो नोबेल एन.व्ही. आणि तिच्या संलग्न कंपन्यांकडून अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (एएनआयएल) मधील प्रमुख ६०.७६% भागभांडवल (Business)संपादित केले. जेएसडब्ल्यू पेंट्सने खुल्या प्रस्तावाची यशस्वी पूर्तता करून ‘एएनआयएल’च्या सार्वजनिक भागधारकांकडून आधीच ०.४४% भागभांडवल संपादित केले आहे.
आजच्या संपादनानंतर जेएसडब्ल्यूचा हिस्सा ६१.२% झाला आहे.जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे आणि ती २३ अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल म्हणाले, “अक्झोनोबेल इंडिया टीमचे जेएसडब्ल्यू परिवारात स्वागत करताना मला आनंद होत आहे. भारताकडे विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाचे पेंट्स तसेच कोटिंग्ज असायला हवेत, असा आमचा विश्वास आहे. ड्युलक्सच्या माध्यमातून, देशभरातील घरे आणि उद्योगांपर्यंत जागतिक दर्जाची उत्पादने पोहोचवण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
”जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले, “अक्झो नोबेल इंडियाचे जेएसडब्ल्यू परिवारात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतातील पेंट्स आणि कोटिंग्ज बाजारपेठेतील सर्वात मोठ्या अधिग्रहणांपैकी हे एक असल्याने ही ऐतिहासिक घटना आहे. ड्युलक्सच्या जादूने आणि जेएसडब्ल्यू पेंट्सच्या विचारप्रक्रियेने, आम्ही ग्राहकांना आनंदित करण्यास तसेच आमच्या भागधारकांसाठी चिरस्थायी मूल्य निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”
सज्जन जिंदाल दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी ऍवार्डने पुरस्कारीत; JSW समूहाने केली उल्लेखनीय वाढ
अक्झोनोबेलचे सीईओ ग्रेग पौक्स-गिलाउम म्हणाले, “आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या आणि अक्झोनोबेलला दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी सज्ज करण्याच्या दिशेने आजचा हा करार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील आमच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत..”
जीएसटी कपातीमुळे वाहन विक्रीला ‘अच्छे दिन’
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सणासुदीच्या हंगामानंतरही मागणीत वाढ होत असल्याचे दिसून आले. भारतात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वर्षानुवर्षे 18.7 टक्के वाढून 412405 युनिट्सचा नवा विक्रम झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण 347522 प्रवासी वाहने विकली गेली.