
कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! (Photo Credit - X)
कंपनीच्या योजनांबद्दल बोलताना कामधेनू लिमिटेडचे संचालक सुनील अग्रवाल म्हणाले, “आज कामधेनू कलर कोटेड शीट्सचा वापर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी प्रकल्पांमध्ये केला जातो. राज्यातील सतत वाढणाऱ्या गृहनिर्माण व पायाभूत सुविधा क्षेत्रामुळे आमच्या उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा विचार करून आम्ही आमच्या उच्च गुणवत्ता असलेल्या कलर कोटेड शीट्सच्या उत्पादन क्षमतेत वाढ करत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय मानकांशी तुल्यबळ असलेल्या कामधेनू कलर मॅक्समुळे निवासी आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये रूफिंग आणि क्लॅडिंगसाठी आकर्षक उपाय मिळतात. या शीट्स बसवणे सोपे असून त्याच्या वापरामुळे कोणत्याही प्रकल्पाच्या बांधकाम गतीत वाढ होते. ग्राहकांच्या आवश्यकतांनुसार कस्टमायझेशन सुनिश्चित करण्यासाठी कामधेनू कलर मॅक्स रेंजमध्ये रेन वॉटर सिस्टीम, रेन गटर, क्रिम्पिंग कर्व्ह, सेल्फ ड्रिलिंग स्क्रू इत्यादी संबंधित उत्पादनेही उपलब्ध आहेत.”
कामधेनू कलर मॅक्स हे प्री-पेंटेड उत्पादने आहेत ज्यात निवडीसाठी आकर्षक रंगांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. उच्च दर्जाच्या स्टील मिश्रधातूच्या अनेक थरांवर खास कोटिंग दिल्यामुळे या उत्पादनांना क्रॅकिंग आणि पीलिंगपासून, अत्यंत हवामानापासून तसेच कठीण बांधकामाच्या परिस्थितीतही संरक्षण मिळते. हे केवळ शीट्सला पूर्णपणे गंज-प्रतिरोधक आणि वॉटरप्रूफ बनवत नाही तर उन्हाळ्यात अंतर्गत भाग थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवते.
हे पर्यावरणपूरक उत्पादन इमारतींच्या कार्बन फूटप्रिंटला कमी करून ग्रीन बिल्डिंग संकल्पनेलाही पूरक आहे. कामधेनू स्टील निर्मितीतील अनुभव आणि कौशल्याचा उपयोग करून सर्वोत्तम कच्चा माल निवडला जातो व अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रियांद्वारे उत्कृष्ट गुणवत्ता उत्पादने तयार केली जातात. ही उत्पादने कठोर गुणवत्ता तपासणीतून जातात, त्यामुळे ती सर्व ऋतूंमध्ये टिकून राहतात.