Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाचही समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 02:31 PM
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाचही समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या विशेष सभांमध्ये या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

नवनिर्वाचित सभापतींची नावे :

निवडणुकीच्या निकालानुसार पुढील सदस्यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे :

विधी समिती : सुजाता बोराटे
महिला व बालकल्याण समिती : राणी पठारे
शहर सुधारणा समिती : संजय नाना काटे
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती : कैलास कुटे
शिक्षण समिती : रविना आंगोळकर

निवड प्रक्रिया आणि उपस्थिती

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी व पीठासीन अधिकारी म्हणून या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

हे सुद्धा वाचा : शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

समित्यांच्या नियमित सभांचे वेळापत्रक जाहीर

नव्या निवडीसोबतच पालिकेने विषय समित्यांच्या नियमित सभांचे वार आणि वेळ खालीलप्रमाणे निश्चित केली आहे

विधी समिती : दर महिन्याचा १ ला व ३ रा शुक्रवार (दु. ३.०० वा.)
महिला व बालकल्याण समिती : २ रा व ४ था गुरुवार (दु. २.३० वा.)
शहर सुधारणा समिती : २ रा व ४ था मंगळवार (दु. २.०० वा.)
क्रीडा व सांस्कृतिक समिती : २ रा व ४ था शुक्रवार (दु. २.३० वा.)
शिक्षण समिती : १ ला व ३ रा गुरुवार (दु. २.३० वा.)

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील ८.६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.

Web Title: The chairmen of the subject committees of pimpri chinchwad municipal corporation have been elected unopposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
1

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
2

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
3

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
4

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.