Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business News: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ परिसरात ‘कीमती ज्वेल्स’चे नवा लॅब-ग्रोन डायमंड स्टोअर…

आपली भूमिका स्पष्ट करताना कीमतीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अरमान कोठारी म्हणाले, "पुणे हे तरुण, प्रगतिशील आणि दर्जाबाबत अधिक सजग ग्राहकांचे शहर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 02:35 AM
Business News: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ परिसरात ‘कीमती ज्वेल्स’चे नवा लॅब-ग्रोन डायमंड स्टोअर…
Follow Us
Follow Us:

पुण्यात बाणेर येथे नवीन स्टोअरचा विस्तार
ग्राहकांना मिळणार उत्कृष्ट खरेदीचा अनुभव 
अंधेरी आणि खराडनंतर महाराष्ट्रातील हे त्यांचे तिसरे रिटेल केंद्र

पुणे: डिझाइन-केंद्रित लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँड ‘कीमती ज्वेल्स’ने पुण्यातील बाणेर येथे आपले नवीन स्टोअर सुरू केले आहे. अरमान कोठारी यांनी स्थापन केलेल्या या ब्रँडला कोठारी समूह, उद्योजक निखिल कामत आणि केविन शाह यांचे पाठबळ लाभले आहे. या नव्या स्टोअरमुळे राज्यातील ब्रँडची ग्राहकांपर्यंत पोहोच आणखी मजबूत झाली आहे. मुंबईतील अंधेरी येथील फ्लॅगशिप स्टोअर आणि पुण्यातील खराडी येथील विद्यमान स्टोअरनंतर बाणेरमधील हे नवे स्टोअर महाराष्ट्रातील (Business) ब्रँडचे तिसरे रिटेल केंद्र ठरले आहे. भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या लक्झरी ग्राहक बाजारपेठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात समकालीन फाईन ज्वेलरी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेला या विस्तारामुळे अधिक बळ मिळाले आहे.

पुण्यातील बाणेर येथील नवीन स्टोअरचे उद्घाटन हे कीमती ज्वेल्सच्या ओम्नीचॅनेल विस्ताराच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या नव्या स्टोअरमुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना ब्रँडच्या प्रमाणित (सर्टिफाइड) लॅब-ग्रोन डायमंड दागिन्यांच्या काळजीपूर्वक निवडलेल्या आकर्षक कलेक्शनचा अधिक सहजपणे लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना उत्कृष्ट खरेदीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या स्टोअरमध्ये दैनंदिन वापरासाठीचे दागिने, विविध प्रसंगांसाठीची ज्वेलरी, वधूंसाठीचे खास दागिने तसेच आधुनिक डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरीचा संगम असलेले आकर्षक स्टेटमेंट पीसेस उपलब्ध आहेत.

कीमतीसाठी महाराष्ट्र ही सातत्याने महत्त्वाची आणि धोरणात्मक वाढीची बाजारपेठ ठरत आहे. वैयक्तिक शैलीसोबतच जाणीवपूर्वक आणि जबाबदार निवडींना प्राधान्य देणारे तरुण व्यावसायिक, उद्योजक आणि आधुनिक लक्झरी ग्राहक यांचा वाढता ग्राहकवर्ग या बाजारपेठेच्या वाढीस चालना देत आहे. महाराष्ट्रभर आपला विस्तार वाढवत, कीमती समकालीन फाईन ज्वेलरी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सहज उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, राज्यातील ग्राहकांशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याच्या दिशेनेही ब्रँड सातत्याने वाटचाल करत आहे.

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी

कीमतीसाठी पुणे ही एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. तरुण व्यावसायिक, उद्योजक आणि दर्जेदार फाईन ज्वेलरीच्या आधुनिक अभिव्यक्तींना पसंती देणाऱ्या जागरूक ग्राहकांचा वाढता वर्ग या शहरात तयार होत आहे. पुण्यात सातत्याने विस्तार करणाऱ्या कीमतीचा उद्देश उत्कृष्ट कारागिरी, आधुनिक सौंदर्यदृष्टी आणि जबाबदार लक्झरी यांचा सुरेख संगम असलेले बारकाईने साकारलेलेदागिने ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा आहे. शहरातील वाढती उपस्थिती ही ग्राहकांना दर्जेदार आणि समकालीन फाईन ज्वेलरीचा अनुभव देण्याच्या ब्रँडच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

कीमतीच्या प्रत्येक स्टोअरमध्ये सोने आणि चांदीतील दैनंदिन वापरासाठीचे दागिने, विविध प्रसंगांसाठीचे आकर्षक कलेक्शन, हलक्या वजनाचे दागिने तसेच लक्षवेधी स्टेटमेंट ज्वेलरीचा वैविध्यपूर्ण संग्रह उपलब्ध आहे. साध्या आणि आकर्षक नॉन-स्टडेड डिझाइन्सपासून ते हिऱ्यांनी जडवलेल्या देखण्या दागिन्यांपर्यंत प्रत्येक कलेक्शनमध्ये कीमतीचे सौंदर्यदृष्टी जपणारे आणि परवडणारी प्रीमियम ज्वेलरी हे तत्त्व प्रतिबिंबित होते. आधुनिक भारतीय महिलेच्या बहुआयामी जीवनशैलीशी सहज जुळवून घेणारे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे दागिने साकारण्यावर कीमतीचा भर आहे.

ब्रँडच्या विस्ताराविषयी बोलताना कीमतीचे अध्यक्ष सुनील कोठारी म्हणाले, “कीमतीच्या विकासाच्या प्रवासात पुणे ही एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. शहरभरातील ग्राहकांकडून आम्हाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे. खराडी आणि आता बाणेर येथील आमच्या स्टोअर्समुळे पुण्यातील दोन प्रमुख भागांमध्ये आमची उपस्थिती अधिक मजबूत झाली असून, अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ‘कीमती’चा अनुभव पोहोचवण्यास आम्ही सक्षम झालो आहोत. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आमचा सातत्याने होत असलेला विस्तार या प्रदेशावरील आमचा दृढ विश्वास अधोरेखित करतो. उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता, उच्च दर्जाची कारागिरी आणि ग्राहक-केंद्रित खरेदीचा अनुभव प्रदान करण्यावर आमचा कायम भर राहील.”

आपली भूमिका स्पष्ट करताना कीमतीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अरमान कोठारी म्हणाले, “पुणे हे तरुण, प्रगतिशील आणि दर्जाबाबत अधिक सजग ग्राहकांचे शहर आहे. त्यामुळे कीमतीच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी ते पूर्णपणे सुसंगत आहे. आम्ही आजच्या भारतीय ग्राहकांसाठी असा ज्वेलरी ब्रँड घडवत आहोत, जो वैयक्तिक वैशिष्ट्य, कौशल्यपूर्ण रचना आणि जाणीवपूर्वक केलेल्या निवडींना महत्त्व देतो. पुण्यात वाढत असलेल्या आमच्या उपस्थितीमुळे या ग्राहकांशी अधिक जवळून संवाद साधण्याची संधी मिळत आहे. त्यांच्या जीवनशैली, आकांक्षा आणि दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक खास क्षणाशी सुसंगत असा दर्जेदार आणि उत्कृष्ट ज्वेलरी अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रासह इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये विस्तार सुरू असतानाही, पुणे आमच्या वाढीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आणि केंद्रबिंदू राहील.”

Business Management: NMIMS एमबीए प्रवेश प्रक्रिया कधीपासून होणार सुरू? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि कॅम्पसची सविस्तर माहिती!

अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील कोठारी समूहाच्या व्यापक उत्पादन कौशल्याच्या बळावर उभारलेला कीमती जागतिक दर्जाची कारागिरी, प्रमाणित लॅब-ग्रोन हिरे, विचारपूर्वक साकारलेले डिझाइन आणि कारखान्यातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या स्पर्धात्मक किंमती यांचा संगम घडवत आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार, आकर्षक आणि सहज उपलब्ध फाईन ज्वेलरीचा अनुभव मिळतो. आपल्या मजबूत उत्पादन क्षमतांचा आणि डायरेक्ट-टू-कन्झ्युमर व्यवसाय मॉडेलचा प्रभावी वापर करून कीमती स्पर्धात्मक किमतीत आकर्षक आणि विचारपूर्वक डिझाइन केलेले दागिने उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे उत्कृष्ट कारागिरीचा दर्जा आणि लॅब-ग्रोन हिऱ्यांचे तेज आजच्या ग्राहकांसाठी अधिक सहज आणि परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध होत आहे.

पुण्यातील हा विस्तार कीमतीच्या देशभर मजबूत रिटेल आणि ओम्नीचॅनेल उपस्थिती निर्माण करण्याच्या व्यापक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबईतील अंधेरी येथील फ्लॅगशिप स्टोअर, पुण्यातील खराडी आणि बाणेर येथील स्टोअर्स तसेच इंदोर आणि दिल्लीतील उपस्थितीच्या माध्यमातून कीमती देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपले रिटेल नेटवर्क सातत्याने विस्तारत आहे. आगामी काळातही ब्रँड आपले रिटेल नेटवर्क अधिक व्यापक करण्याची योजना आखत असून, विचारपूर्वक साकारलेले डिझाइन, उत्कृष्ट कारागिरी, प्रमाणित लॅब-ग्रोन हिरे आणि कारखान्यातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या स्पर्धात्मक किंमती या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचा लाभ देशभरातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.

Web Title: Kimati brand second store in pune baner gives fresh impetus to expansion in maharashtra business news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Business News
  • Gold Jewelry
  • Pune

संबंधित बातम्या

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
1

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
3

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
4

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.