Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra FDA: सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील एफडीएची बंदी उठवली; महाराष्ट्र लागू करणार नवीन SOP

Maharashtra FDA : महाराष्ट्रात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी उठवण्यात आली आहे. तेलातील भेसळ रोखण्यासाठी आणि लहान व्यवसायांचे कामकाज अविरत सुरू राहावे यासाठी नवीन एसओपी (SOP) विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफडीएला (FDA) दिले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 27, 2026 | 01:24 PM
खाद्यतेल स्वस्त होणार

खाद्यतेल स्वस्त होणार

Follow Us
Follow Us:
  • सुट्या तेलावरील बंदीला स्थगिती
  • मध्यम मार्ग आणि नवीन एसओपी (SOP)
  • ग्रामीण भाग व लहान व्यापाऱ्यांचे हित 

महाराष्ट्रातील पारंपरिक तेल व्यापारी, किराणा व्यावसायिक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Maharashtra FDA) नुकताच सुट्या खाद्यतेलाच्या आणि चरबीच्या विक्रीवर घातलेला कडक बंदीचा आदेश मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, या संदर्भात नवीन मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) लागू केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत अन्न सुरक्षेशी तडजोड न करता लहान व्यापाऱ्यांचे हित जपणारा “मध्यम मार्ग” काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्रात खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २० ऑगस्ट रोजी एका आदेशाद्वारे राज्यात सुट्या तेलाच्या विक्रीवर सरसकट बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार तेल केवळ सीलबंद, लेबल असलेल्या आणि फूड-ग्रेड कंटेनरमध्येच विकणे अनिवार्य करण्यात आले होते. पॅकेटवर तेलाचा मूळ स्रोत, बॅच क्रमांक, पॅकिंगची तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख (Expiry Date) छापणे बंधनकारक केले होते. एफडीएच्या या कडक निर्णयामुळे राज्यभरातील लहान व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

हे देखील वाचा : साखर-कांद्याच्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचा ‘नवा प्लॅन’, परिणाम होणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी वाचाच

व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आणि ग्रामीण भागातील समस्या

एफडीएच्या सरसकट बंदीच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशन आणि लहान किराणा दुकानदारांनी तीव्र विरोध दर्शवला. पिढ्यानपिढ्या सुट्या तेलाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबांचे रोजगार या एका निर्णयामुळे धोक्यात आले होते. याशिवाय ग्रामीण भागात किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये दररोजच्या गरजेनुसार थोडे-थोडे (उदा. २०० ते ५०० ग्रॅम) सुटे तेल खरेदी करण्याची जुनी सवय आहे. ग्रामीण भागात सर्वत्र पॅकबंद तेलाचे मोठे पाकीट उपलब्ध नसतात किंवा ते खरेदी करणे गरिबांना परवडत नाही, असा मुद्दाही व्यापाऱ्यांनी मांडला.

या मुद्याची गंभीर दखल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. अनेक मंत्र्यांनी सुट्या तेलावरील सरसकट बंदीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि लहान व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “तेलातील भेसळ रोखणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिकता आहेच, परंतु पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे बंद पाडून लहान दुकानदारांना देशोधडीला लावणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे गुणवत्ता टिकवून ठेवत सुट्या तेलाचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवता येईल, अशी व्यावहारिक एसओपी एफडीएसंदर्भात तयार करेल.”

हे देखील वाचा : झुकरबर्गचा AI प्लॅन फसला! 60% कर्मचारी कपातीपासून यू-टर्नपर्यंत, काय होता ‘Project OT’?

नवीन एसओपी (SOP) मध्ये काय असणार?

आता एफडीकडून एक विस्तृत एसओपी तयार केली जात आहे. या नवीन नियमावलीत सुट्या तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि त्यात होणारी स्वस्त तेलाची भेसळ रोखण्यासाठी कडक मानके ठरवली जातील. तेलाचा साठा कोणत्या प्रकारच्या स्वच्छ आणि सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवावा, तेलाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी कशी करावी आणि तेलाचा स्रोत कसा स्पष्ट असावा, याबद्दलची नियमावली जाहीर केली जाईल.

सध्यासाठी पूर्वीचा सरसकट बंदीचा आदेश शिथिल करण्यात आला असून व्यापाऱ्यांना काम सुरू ठेवण्यास वाव देण्यात आला आहे. मात्र, नवीन एसओपी लागू झाल्यानंतर प्रत्येक दुकानदाराला या स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागेल. जर नवीन एसओपीचे उल्लंघन करून भेसळयुक्त तेल विकल्याचे आढळले, तर प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल. सरकारच्या या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रभरातील खाद्यतेल व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Maharashtra fda loose edible oil ban lifted new sop devendra fadnavis marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Business News
  • FDA
  • oil

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
2

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
3

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता
4

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.