Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Vibrant Goa Summit: गोव्यात २९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ५० हून अधिक देशांतील प्रतिनिधी, ३०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि १० हजारांहून अधिक व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 16, 2026 | 04:42 PM
उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Follow Us
Follow Us:
  • गोव्याच्या उद्योगांना मिळणार जागतिक भरारी!
  • ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका
  • निर्यातीला चालना
Vibrant Goa Summit: गोव्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्ताराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. २९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सांताक्रूझ येथील गोवा विद्यापीठाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ही तीन दिवसीय जागतिक व्यावसायिक परिषद होणार आहे. या परिषदेत ५० हून अधिक देशांतील आंतरराष्ट्रीय खरेदीदार, गुंतवणूकदार, उद्योगपती आणि व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ‘व्हायब्रंट गोवा फाउंडेशन’च्या वतीने अध्यक्ष विनय वर्मा यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाचे सहकार्य लाभले आहे.

५० देशांतील प्रतिनिधींचा सहभाग; १० हजार व्यावसायिकांची उपस्थिती अपेक्षित

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिषदेत मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील उद्योग प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. माजी भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव समारोप सत्रात मार्गदर्शन करणार असल्याचे नियोजन आहे.

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

२२० एमएसएमई उद्योगांना ३०० जागतिक खरेदीदारांशी जोडणार

या परिषदेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’ हा उपक्रम. यामध्ये जगभरातील ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना गोव्यातील निवडक २२० एमएसएमई उद्योगांशी थेट जोडले जाणार आहे. या उद्योगांची निवड खरेदीदारांची मागणी, उत्पादनांची उपयुक्तता, निर्यात क्षमता आणि मोठ्या ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी या निकषांवर करण्यात आली आहे. तीन दिवसांत १,००० हून अधिक पूर्वनियोजित बिझनेस-टू-बिझनेस (B2B) बैठका घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना थेट निर्यात करार, नवीन ग्राहक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार भागीदारीची संधी मिळू शकणार आहे.

‘जागतिक खरेदीदारांना थेट गोव्यात आणत आहोत’ – विनय वर्मा

व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे अध्यक्ष विनय वर्मा यांनी सांगितले की, गोव्यातील एमएसएमई उद्योगांना परदेशात खरेदीदार शोधण्यासाठी फिरावे लागू नये, यासाठी स्पष्ट व्यावसायिक गरजा असलेल्या आणि पूर्वपात्रता तपासलेल्या आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना थेट गोव्यात आणण्यात येत आहे. या उपक्रमातून २०३७ पर्यंत निर्यातक्षम एमएसएमई उद्योगांची मजबूत फळी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. व्यावसायिक बैठकांमधून प्रत्यक्षात किती व्यापार संधी निर्माण झाल्या, याचाही आयोजकांकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

३० हून अधिक आफ्रिकी देशांसोबत व्यापाराच्या संधी

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) च्या सहकार्याने चौथ्या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ३० हून अधिक आफ्रिकी देशांचे प्रतिनिधी आणि भारतीय उद्योजक सहभागी होतील. या व्यासपीठावर B2B आणि बिझनेस-टू-गव्हर्नमेंट (B2G) बैठका होणार असून, व्यापार आणि गुंतवणुकीच्या नवीन संधींवर चर्चा केली जाणार आहे. परिषदेचे सह-अध्यक्ष अरमान बांकली यांच्या माहितीनुसार, आफ्रिकी उद्योजक विशिष्ट उत्पादनांच्या खरेदीसाठी आवश्यक यादी आणि गुंतवणूक प्रस्तावांसह सहभागी होणार आहेत.

आठ प्रमुख क्षेत्रांवर विशेष लक्ष

या जागतिक परिषदेत आठ महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे.
1. पायाभूत सुविधा
2. तंत्रज्ञान
3. आरोग्य सेवा
4. कृषी आणि अन्नप्रक्रिया
5. उत्पादन क्षेत्र
6. ऊर्जा आणि शाश्वत विकास
7. पर्यटन
8. शिक्षण

या क्षेत्रांमधील गुंतवणूक, नवीन तंत्रज्ञान, उद्योग विस्तार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर विविध चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

गोवा बनणार सेमीकंडक्टर आणि स्टार्टअप हब?

३० ऑक्टोबर रोजी ‘ग्लोबल चेंबर’च्या सहकार्याने ‘भारताचा पुढील सेमीकंडक्टर ग्रोथ कॉरिडॉर’ या विषयावर विशेष चर्चासत्र होणार आहे. या चर्चेत गोव्यातील तुये, चिंबेल आणि पर्वरी परिसरातील आयटी आणि स्टार्टअप हबच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योगांसाठी आवश्यक सुविधा आणि नवउद्योजकांना मिळणाऱ्या संधींवर विचारमंथन होणार आहे.

जगभरातील गोमंतकीय उद्योजक एकाच व्यासपीठावर

३१ ऑक्टोबर रोजी जगभरात स्थायिक झालेले गोमंतकीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक प्रतिनिधी एका व्यासपीठावर येणार आहेत. गोव्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणे, या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’

स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांसाठीही विशेष उपक्रम

परिषदेत TiE पणजीच्या माध्यमातून स्टार्टअप्ससाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये एंजल इन्व्हेस्टिंग, पिच डेक सादरीकरण आणि ‘TiE ओपन माइक’ यांचा समावेश असेल. ‘स्टुडंट बडी प्रोग्राम’च्या माध्यमातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच तरुणांच्या कौशल्यांची आणि करिअरविषयक अपेक्षांची माहिती घेण्यासाठी ‘यूथ स्किल करिअर सेन्सस’ हा उपक्रम राबवला जाणार आहे.

‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेला जागतिक बाजारपेठेची जोड

गोव्यातील स्थानिक उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेशी जोडून ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा या परिषदेचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला GIBF, वर्ल्ड ट्रेड सेंटर, अ‍ॅडम ग्लोबल ग्रुप, TiE पणजी, NBCC, RVNL आणि गोवा पर्यटन विभाग यांसारख्या संस्थांचे सहकार्य लाभत आहे. या परिषदेमधून प्रत्यक्ष व्यापार करार, निर्यात संधी आणि नवीन गुंतवणूक किती प्रमाणात निर्माण होते, यावर या उपक्रमाचे यश अवलंबून असेल.

Web Title: Vibrant goa global business summit 2026 220 msmes connect with 300 international buyers sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Goa

संबंधित बातम्या

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता
1

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप
2

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

Instamart Quick India Movement : सणासुदीत इंस्टामार्टचा धमाकेदार Sale! Bosch मिक्सर 2499; होम प्रॉडक्ट्सवर 50-90% बंपर सूट
3

Instamart Quick India Movement : सणासुदीत इंस्टामार्टचा धमाकेदार Sale! Bosch मिक्सर 2499; होम प्रॉडक्ट्सवर 50-90% बंपर सूट

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया
4

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.