
फोटो सौजन्य: ANI
देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे. हा आपला महाराष्ट्र नेहमीच मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यापाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, आजच्या 5G च्या युगात देखील राज्यातील काही दुर्गम भागात इंटरनेट सेवा मिळत नाही. यावरच आता राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. चला यबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील अति दुर्गम आणि वंचित भागात उपग्रह आधारित उत्तम इंटरनेट सेवा पोहचवण्यासाठी राज्य सरकारने Elon Musk च्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत सहयोग केला आहे. ही पार्टनरशिप डिजटल इंडियासाठी एक महत्वाचे पाऊल मानले जाते.
फसवणूक प्रतिबंधक पायाभूत सुविधांसह MSME वित्तपुरवठा मजबूत करण्यासाठी SIDBI आणि मोनेटागोची भागीदारी
एलोन मस्कच्या मालकीच्या स्टारलिंक सोबत अधिकृतरित्या सहकार्य करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. या भागीदारीचा उद्देश राज्यातील दुर्गम आणि वंचित भागांना उपग्रह-आधारित इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
महाराष्ट्र सरकारने सरकारी विभाग, ग्रामीण भाग आणि महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांना उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत इरादा पत्र (LOI) स्वाक्षरीत केले आहे. मात्र, भारत सरकारकडून आवश्यक नियामक आणि अनुपालन मंजुरी मिळाल्यानंतरच हे सहकार्य प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्टारलिंकच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी LOI वर स्वाक्षरी केली. स्टारलिंकची स्थापना आणि मालकी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांच्याकडे आहे.
स्टारलिंक हे लो-अर्थ ऑर्बिटमध्ये कार्यरत असलेले जगातील सर्वात अत्याधुनिक उपग्रह नक्षत्र मानले जाते. हे तंत्रज्ञान विश्वसनीय ब्रॉडबँड इंटरनेट उपलब्ध करून देण्यास सक्षम असून स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ कॉल आणि इतर डिजिटल सेवांना समर्थपणे हाताळू शकते.