Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

दावोस कराराच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 11 हजार 519 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ज्यामुळे 18 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 06:50 PM
: 'दावोस' द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक!

: 'दावोस' द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक!

Follow Us
Follow Us:
  • दावोस कराराच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात 12 हजार कोटींची गुंतवणूक
  • 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली असून, यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. यापैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11 हजार 510 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, त्यातून 18 हजार रोजगारांची निर्मिती होईल. उत्तर महाराष्ट्रात एकूण सुमारे 7 हजार नागरिकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सुपे (ता. पारनेर) येथील एमआयडीसीमध्ये ‘तौरल इंडिया’ कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गीते, तसेच थोनी अ‍ॅल्युमिनियमचे लोथर थोनी (जर्मनी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Hybrid Mutual Funds: नवीन गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड म्युच्युअल फंड का सर्वोत्तम मानले जातात? जाणून घ्या सविस्तर

उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात उद्योगधंदे वाढीस लागावेत यासाठी राज्यातील उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. उद्योगांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. पुढील 5 वर्षे उद्योगांसाठी वीजदर स्थिर ठेवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई

सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

तौरल इंडिया औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक

तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेअंतर्गत आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन देशातच होणे काळाची गरज आहे. परदेशातून आयात होणारे अनेक औद्योगिक घटक आता महाराष्ट्रातच, तेही भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. उद्योग उभारणीबरोबरच तो पर्यावरणपूरक असणे आवश्यक असून, या प्रकल्पात ‘सस्टेनेबल कास्टिंग’ आणि ‘रिसायकलिंग’वर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या Dairy Milk ची गोड कहाणी जाणून घ्या सविस्तर

मराठी उद्योजकाचे यश प्रेरणादायी

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, दावोस येथे झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात साकार होत आहेत. एका मराठी उद्योजकाने 500 कोटी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभारणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्तेबांधणीसाठी लागणारे अत्याधुनिक औद्योगिक घटक आता थेट अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी आहे.

Web Title: Investment worth rs 12000 crores in the ahilyanagar district through davos agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Business
  • Davos

संबंधित बातम्या

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च
1

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…
2

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई
3

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.