Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राला जागतिक ‘MICE’ हब बनवण्यासाठी पर्यटन विभागाचा मोठा निर्णय; जर्मनीच्या आघाडीच्या ‘JWC’ कंपनीसोबत ऐतिहासिक करार

महाराष्ट्र पर्यटन विभागाने राज्याला जागतिक 'MICE' (परिषदा आणि प्रदर्शने) हब बनवण्यासाठी जर्मनीच्या 'JWC GmbH' कंपनीसोबत महत्त्वाचा करार केला आहे. यामुळे राज्यात रोजगार आणि पर्यटन महसूल वाढणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 03:33 PM
महाराष्ट्राला जागतिक 'MICE' हब बनवण्यासाठी पर्यटन विभागाचा मोठा निर्णय

महाराष्ट्राला जागतिक 'MICE' हब बनवण्यासाठी पर्यटन विभागाचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राला जागतिक ‘MICE’ हब बनवण्यासाठी पर्यटन विभागाचा मोठा निर्णय
  • जर्मनीच्या आघाडीच्या ‘JWC’ कंपनीसोबत ऐतिहासिक करार
  • वाचा संपूर्ण बातमी
मुंबई, १८ जून २०२६: महाराष्ट्र पर्यटन विभागाने महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो (MCB) आणि बैठका, प्रोत्साहनपर दौरे, परिषदा, प्रदर्शने (MICE) क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक जोचेन विट कन्सल्टिंग (JWC GmbH) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असल्याची घोषणा केली. पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.), उप सचिव श्री. विजय पोवार, जोचेन विट कन्सल्टिंग कंपनीचे अध्यक्ष आणि भागीदार श्री. जोचेन विट, जोचेन विट कन्सल्टिंग कंपनीचे भागीदार श्री. सेबॅस्टियन विट आणि जोचेन विट कन्सल्टिंग कंपनीचे (भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया) चे कार्यकारी संचालक श्री. विजय शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. राज्याला व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागतिक स्तरावर ओळख मिळावी म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याला माईस (MICE) क्षेत्रासाठी प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने पर्यटन विभागाने ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’ची स्थापना केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा, प्रदर्शने आणि व्यावसायिक कार्यक्रमांना आकर्षित करणे, आणि त्याद्वारे जागतिक माईस (MICE) क्षेत्रामध्ये राज्याचे स्थान बळकट करणे हा या ब्युरोचा मुख्य हेतू आहे.

याप्रसंगी पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.) म्हणाले, “पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे मनुष्यबळ, महत्त्वाकांक्षा या सर्वच बाबतीत महाराष्ट्र राज्य सक्षम असल्याचा आम्हाला विश्वास आहे. जोचेन विट कन्सल्टिंगच्या मार्गदर्शनामुळे राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या हिताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे सज्ज आहोत.”

करारासंबंधित धोरणात्मक हेतूला गती देण्यासाठी ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’ने जर्मनीच्या कोलोन शहरात मुख्यालय असलेल्या आणि २००७ पासून कार्यरत असलेल्या जोचेन विट कन्सल्टिंग कंपनीसह भागीदारी केली आहे. पर्यटन स्थळ धोरण, पर्यटन स्थळांचा विकास, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन आणि विविध भागधारकांना एकत्र आणून या कंपनीने एक नामवंत सल्लागार संस्था म्हणून स्वतःचे स्थान बळकट केले आहे. या क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान संस्थेची खरी ताकद आहे.

लाखो भारतीयांच्या घराचा गाडा चालवतात या 10 कंपन्या; यादी पाहून थक्क व्हाल!

या भागीदारीमुळे महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरोला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि जागतिक संपर्कासाठी मोठा फायदा होईल. त्याचबरोबरीने जगभरातील इतर प्रगत शहरांबरोबर स्पर्धा करण्यासाठी राज्याची क्षमता अधिक बळकट होईल. संबंधित ब्युरोचे काम प्रदर्शन आणि सल्लागार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिक पाहणार आहेत. यामुळे ब्युरोचे कामकाज जागतिक बाजारपेठेच्या गरजेनुसार आणि जागतिक स्तरावरील उत्कृष्ट पद्धतींशी सुसंगत साधून सुरळीत सुरु राहिल.

या कराराबाबत भाष्य करताना जेडब्ल्युसीचे अध्यक्ष आणि भागीदार श्री. जोचेन विट म्हणाले, “आंतरराष्ट्रीय माईस (MICE) उद्योग क्षेत्राचे एक प्रमुख केंद्र बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व योग्य घटक महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. बळकट आर्थिक विकास, उद्योजकीय गतिशीलता, शासकीय पाठबळ आणि व्यावसायिक कार्यक्रमांच्या क्षेत्राचा वेगाने होणारा विस्तार यांचे एकत्रीकरण फार कमी बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याच्या क्षमतेवर आमचा ठाम विश्वास आहे आणि ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’ला त्यांच्या या प्रवासात सहकार्य करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. जागतिक माईस (MICE) उद्योगक्षेत्रामध्ये महाराष्ट्राला नवे स्थान मिळवून देण्यासाठी आणि आमच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचे योगदान देण्याची संधी मिळणे, हा आमचा मोठा सन्मान आहे.”

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना आकर्षित करण्याबरोबरच, महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरोच्या या उपक्रमामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणे, पर्यटनाच्या महसुलात वाढ होणे आणि शाश्वत विकासाला गती मिळून राज्याची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे. या करारामुळे जागतिक पातळीवरील व्यावसायिक कार्यक्रमांसाठी प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्याचे ध्येय महाराष्ट्राने पुन्हा अधोरेखित केले आहे.

Gold Price: 3 दिवसांची तेजी संपुष्टात… करार झाल्यानंतर सोन्याचा दर धाडकन कोसळला; जाणून घ्या 24 कॅरेटचा दर

Web Title: Maharashtra tourism department signs mou with germany jwc gmbh to boost mice hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Maharashtra Tourism

संबंधित बातम्या

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
1

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
2

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
3

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.