
MakeMyTrip 'ट्रॅव्हल का मुहुरत'चा रेकॉर्ड! ६ दिवसांत १०९ देशांत बुकिंग (Photo Credit - X)
नोव्हेंबर २०२५: भारतातील प्रवासाच्या वर्तनात मोठे बदल होत असल्याची नोंद मेकमायट्रिप (MakeMyTrip) च्या ‘ट्रॅव्हल का मुहुरत’ अभियानाच्या पहिल्या सहा दिवसांतील (ऑक्टोबर २९ ते नोव्हेंबर ०३) प्राथमिक प्रवाहातून झाली आहे. या सेलमध्ये विमानप्रवासाचे आरक्षण लवकर करणे, व्यापक स्थळांचा शोध घेणे आणि सातत्याने अव्वल दर्जाच्या (Premium) निवास सुविधा निवडणे, हे प्रमुख प्रवाह निदर्शनास आले आहेत. त्याचबरोबर पर्यटक डील्स आणि ऑफर्स यांच्यामार्फत पैशाचा पुरेपूर मोबदला मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही दिसून आले आहे.
वर्षाखेरीच्या काळातील विमानप्रवासाचे आरक्षण आधीच करून ठेवण्याचे सुरुवातीला कमी असलेले प्रमाण आता दुपटीने वाढले आहे. हा निवास सुविधांसाठी उत्तम निदर्शक ठरत आहे, कारण पारंपरिक वर्तनानुसार प्रवासाचे आरक्षण झाल्यानंतर पुढील टप्प्यात मुक्कामाच्या जागांचे आरक्षण केले जाते. निवास प्रवर्गामध्ये अव्वल दर्जा (प्रिमियमायझेशन) आणि प्रवर्गाची व्यापकता हे मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत.
पहिल्या सहा दिवसांमध्ये झालेल्या प्रवासाच्या आरक्षणाची व्यापकता सर्व प्रवर्गांतील सहभागाचे मोठे प्रमाण अधोरेखित करते:
प्रवासी मूल्यावर बारकाईने नजर ठेवून असले तरीही अव्वल दर्जा हा विषय सातत्याने निर्णायक होता. हॉटेलांच्या प्रवर्गात दर तिसरे आरक्षण हे ४-स्टार किंवा ५-स्टार हॉटेलसाठी होते. सरासरी मुक्कामाच्या कालावधीत किंचित वाढ होऊन तो १.७ रात्रींवरून १.८ रात्री झाला आहे. आंतरराष्ट्रीय आरक्षणांमध्ये ४-स्टार व ५-स्टार हॉटेलांमधील आरक्षणाचे प्रमाण ६४.५ टक्के होते, तर मुक्कामाचा सरासरी कालावधी ४.९ रात्री एवढा होता.
प्रवासी अव्वल दर्जाच्या निवास सुविधांचा उपयोग करत आहेत, पण मूल्याबाबत तेवढेच जागरूक आहेत. देशांतर्गत हॉटेल्स बुक करणारे ९६ टक्के पर्यटक डिस्काउंट कूपन्स आणि पार्टनर बँका (एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सिस बँक) तसेच नेटवर्क पार्टनर्स (व्हिजा व रुपे) द्वारे दिल्या जाणाऱ्या ऑफर्सचा लाभ घेत होते.
मोक्याच्या वेळी दिल्या जाणाऱ्या ऑफर्स आणि मर्यादित इन्व्हेंटरी डील्स यांमुळेही ग्राहकांचे लक्ष मोठ्या प्रमाणात वेधले जाते. संध्याकाळी ६:०० ते रात्री ९:०० या काळातील दैनंदिन ‘लायटनिंग ड्रॉप्स’ लक्षवेधी ठरले, कारण ग्राहक सर्वोत्तम दरांच्या शोधातच होते.
मेकमायट्रिपचे सहसंस्थापक आणि ग्रुप सीईओ राजेश मागाव म्हणाले, “प्रवासी नियोजनाच्या प्रक्रियेत लवकर येत आहेत आणि अधिक विचारपूर्वक निवडी करत आहेत ही बाब प्रोत्साहन देणारी आहे. ‘ट्रॅव्हल का मुहुरत’च्या माध्यमातून प्रवासी, पार्टनर्स आणि संपूर्ण उद्योग अशा परिसंस्थेतील सर्वांना लाभ देणारा एक मंच निर्माण करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. सुरुवातीचे प्रवाह ही या दिशेने झालेली सकारात्मक सुरुवात आहे.”
हे अभियान नोव्हेंबर महिन्यात सुरू राहणार असून, याच दर आठवड्याला वेगवेगळे विषय ठरवले जाणार आहेत, तसेच पार्टनर्सच्या ऑफर्समुळे पर्यटकांना चालना मिळणार आहे.