
मॅरियट आता २६ नव्या हॉटेल्सचे उद्घाटन करणार
सिरीज बाय मॅरियट प्रादेशिक स्तरावर डिझाइन करण्यात आलेला, जागतिक स्तराशी संलग्न, कलेक्शन ब्रँड आहे, जो स्थानिक पातळीवर प्रशंसित हॉटेल ग्रुप्सना मॅरियट बोनव्हॉयच्या विश्वसनीय आश्रयांतर्गत एकत्र आणतो. ‘जागतिक देशांतर्गत’ पर्यटकांसाठी डिझाइन करण्यात आलेला ब्रँड मुलभूत सुविधा देतो, जसे आरामदायी रूम्स, विश्वसनीय सेवा आणि स्थानिक अनुभव, ज्यामधून प्रत्येक ठिकाणाची विशिष्टता दिसून येते.
ग्राहकांना देण्यात येणार उत्तम सेवा
द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट जागतिक स्तरावर उद्घाटन करण्यात येणारी ब्रँडची पहिली मालमत्ता आहे, ज्यामधून शाश्वतता व प्रादेशिक सौंदर्यामध्ये सामावलेल्या पर्यावरणाप्रती जागरूक हॉटेल्सचे कलेक्शन दिसून येते. वर्दळीच्या व्यवसाय केंद्रांपासून विश्रांतीसाठी शांतमय स्थळांपर्यंत प्रत्येक मालमत्ता प्रत्येक अतिथीच्या पर्यटन उद्देशाची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जेथे कामासंदर्भात करार करायचा असो, प्रियजनांसोबत पुन्हा धमाल-मस्ती करायची असो किंवा रोजच्या कामामधून काहीसा ब्रेक घेऊन शांतमय क्षणाचा आनंद घ्यायचा असो, प्रत्येक क्षणासाठी उत्तम सेवा आहेत.
भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
काय म्हणाले गुंतवणूकदार
“आम्हाला द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबत आमच्या धोरणात्मक कराराच्या माध्यमातून भारतात सिरीज बाय मॅरियट लाँच करण्याचा आनंद होत आहे,” असे मॅरियट इंटरनॅशनलचे दक्षिण आशियामधील सीनियर वाइस प्रेसिडण्ट (वरिष्ठ उपाध्यक्ष) किरण अँडिकोट म्हणाले. “भारतातील वैविध्यपूर्ण देशांतर्गत पर्यटन बाजारपेठ आणि विश्वासार्ह, किफायतशीर स्टेसाठी (निवास व्यवस्था) वाढती मागणी या ब्रँडसाठी अनुकूल स्थिती निर्माण करतात. सिरीज बाय मॅरियट प्रादेशिक गाथांना साजरे करते, तसेच मॅरियण्टकडून अतिथींची अपेक्षा असलेली सुसंगता व केअर देते. हे २६ उद्घाटन करण्यात येणारे हॉटेल्स व्यापक सादरीकरणाची सुरूवात आहे, जेथे आगामी वर्षामध्ये १०० हून अधिक हॉटेल्स लाँच करण्याची योजना आहे.”
उद्घाटनाचा पहिला टप्पा – नोव्हेंबर २०२५
द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट अंतर्गत उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात २३ शहरांमध्ये २६ मालमत्तांमधील १९०० हून अधिक रूम्सना सादर करण्यात येईल, या मालमत्ता पुढीलप्रमाणे:
कोणत्या मिळणार सुविधा
द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट येथे निवास सुविधेमध्ये राहणाऱ्या अतिथींना पुढील गोष्टींचा आनंद मिळू शकतो:
कशी असणार व्यवस्था
मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कार-प्राप्त पर्यटन उपक्रम मॅरियट बोनव्हॉयमध्ये सहभाग घेणाऱ्या द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट अंतर्गत सर्व मालमत्ता सदस्यांना नवीन हॉटेल्समध्ये आणि मॅरियट बोनव्हॉयच्या असाधारण हॉटेल ब्रँड्सच्या पोर्टफोलिओमधील इतर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्समध्ये स्टेसाठी पॉइण्ट्स देतात. मॅरियट बोनव्हॉय अॅपसह सदस्य वैयक्तिक सुविधा आणि कॉन्टॅक्टलेस अनुभवाचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे ते परिपूर्ण समाधानासह प्रवास करू शकतात.
मॅरियट इंटरनॅशनलसाठी प्रमुख विकास बाजारपेठ भारतातील कन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (Concept Hospitality Private Limited) (सीएचपीएल) सोबत संस्थापकीय करार करत सिरीज बाय मॅरियट लाँच करण्यात आले आहे. बहुराष्ट्रीय समूह सीजी कॉर्प ग्लोबलचा आदरातिथ्य विभाग सीजी हॉस्पिटॅलिटी सीएचपीएलमध्ये बहुसंख्य भागधारक आहे.