Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा! मॅच ग्रुप आणि गृह मंत्रालयाच्या I4C ची मोठी भागीदारी

Match Group Tinder Hinge I4C Partnership : ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या 'रोमान्स स्कॅम' आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी मॅच ग्रुपने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रासोबत' महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 23, 2026 | 05:11 PM
ऑनलाईन प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

ऑनलाईन प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाईन प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!
  • मॅच ग्रुप,गृह मंत्रालयाच्या I4C ची मोठी भागीदारी
  • भारतात ‘रोमान्स स्कॅम’विरोधात जनजागृती मोहीम
Match Group Tinder Hinge I4C Partnership : भारतात आयोजित करण्यात आलेल्या ट्रस्ट अँड सेफ्टी फेस्टिव्हलच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने, टिंडर, हिंज आणि द लीग या ब्रँडची मूळ कंपनी असलेल्या मॅच ग्रुपने आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रासोबत (I4C) भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीअंतर्गत भारतात रोमान्स स्कॅमबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे डेटिंग करणाऱ्यांना फसवणुकीच्या सामान्य पद्धती ओळखणे, संभाव्य धोक्याची चिन्हे समजून घेणे तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी अधिकृत संसाधनांचा वापर करण्याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. ( Match Group Tinder Hinge I4C Partnership ) 

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांनो मोठी खूशखबर! 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

रोमान्स स्कॅमचे विविध प्रकार

रोमान्स स्कॅमचे विविध प्रकार असू शकतात. अशा प्रकरणांमध्ये फसवणूक करणारे अनेकदा कालांतराने विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर पैसे किंवा संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. या भागीदारीच्या माध्यमातून मॅच ग्रुप आणि I4C डेटिंग करणाऱ्यांसाठी व्यावहारिक आणि स्थानिक परिस्थितीशी सुसंगत माहिती उपलब्ध करून देतील. यामुळे संभाव्य धोक्याची चिन्हे ओळखणे आणि मदतीसाठी कुठे संपर्क साधावा हे समजून घेणे शक्य होईल.

पाच प्रमुख बाबींवर मार्गदर्शन

या मोहिमेअंतर्गत टिंडर, हिंज आणि द लीग त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्म्स आणि माध्यमांद्वारे वापरकर्त्यांसोबत उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन सामायिक करतील. रोमान्स स्कॅमविषयी यापूर्वीपासून उपलब्ध असलेल्या जनजागृती संदेशांच्या आधारे आणि भारतातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन I4C च्या सहकार्याने ही माहिती अधिक प्रभावी करण्यात आली आहे. या अंतर्गत वापरकर्त्यांसाठी खालील पाच प्रमुख बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

संभाषण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेण्याबाबत सावधगिरी : एखादी नवीन ओळख झालेली व्यक्ती संभाषण त्वरित दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेण्याचा आग्रह करत असेल, विशेषतः व्हिडिओ कॉल किंवा प्रत्यक्ष भेट टाळत असेल, तर सावध राहण्याचे आवाहन डेटिंग करणाऱ्यांना करण्यात येणार आहे.

आपण कोणाशी संवाद साधत आहोत याची खातरजमा करणे : वापरकर्त्यांनी प्रोफाइलवरील पडताळणीची चिन्हे तपासावीत आणि प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी व्हिडिओ कॉलचा विचार करावा, जेणेकरून समोरची व्यक्ती स्वतःबद्दल सांगत असलेली माहिती खरी आहे का, याची खातरजमा करता येईल.

संशयास्पद गुंतवणूक आणि आर्थिक सल्ला नाकारणे : नवीन ओळख झालेली व्यक्ती क्रिप्टोकरन्सी किंवा गुंतवणुकीबाबत सल्ला देत असेल, असामान्यपणे जास्त परताव्याचे आश्वासन देत असेल किंवा आकर्षक आर्थिक संधींचे आमिष दाखवत असेल, तर अशा प्रस्तावांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

पैशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे : व्हिसा शुल्क, वैद्यकीय खर्च, दुरुस्ती किंवा प्रवासाचा खर्च अशा विविध कारणांचा आधार घेऊन फसवणूक करणारे पैसे मागू शकतात. त्यामुळे केवळ ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीला पैसे, गिफ्ट कार्ड किंवा गुंतवणुकीच्या स्वरूपात रक्कम पाठवू नये, याची आठवण वापरकर्त्यांना करून दिली जाणार आहे.

कालांतराने विश्वास संपादन करण्याच्या प्रयत्नांबाबत सतर्क राहणे : काही फसवणुकीची प्रकरणे अनेक आठवडे किंवा महिने चालू शकतात. फसवणूक करणारे आधी नातेसंबंध निर्माण करतात आणि नंतर आर्थिक मदतीची मागणी करतात. त्यामुळे नवीन ओळख समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घ्यावा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नयेत, असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रोमान्स स्कॅमचे स्वरूप सतत बदलत

मॅच ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ट्रस्ट अँड सेफ्टी विभागाचे प्रमुख योएल रॉथ म्हणाले, “अधिक सुरक्षित ऑनलाइन डेटिंगचा अनुभव निर्माण करण्यासाठी कोणत्याही एका प्लॅटफॉर्मचे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत. रोमान्स स्कॅमचे स्वरूप सतत बदलत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि इतर सुरक्षा क्षेत्रातील भागीदार यांच्यात जागतिक स्तरावर सहकार्य असणे महत्त्वाचे आहे. I4C सोबतची आमची भागीदारी भारतात या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणते. ट्रस्ट अँड सेफ्टी क्षेत्रातील आमचा अनुभव आणि स्थानिक तज्ज्ञतेच्या मदतीने लोकांना संभाव्य फसवणुकीची चिन्हे ओळखण्यास आणि ऑनलाइन डेटिंग करताना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. ऑनलाइन डेटिंगच्या संपूर्ण परिसंस्थेत सुरक्षिततेची जबाबदारी सामायिक असावी, या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.”

अधिक सुरक्षित डेटिंगसाठी व्यापक जनजागृती

I4C सोबतची भागीदारी मॅच ग्रुपच्या विविध ब्रँड्सअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या व्यापक ट्रस्ट अँड सेफ्टी उपक्रमांना पूरक आहे. या उपक्रमांमध्ये वापरकर्त्यांचे प्रबोधन, तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा उपाय आणि बाह्य सुरक्षा भागीदारांसोबतचे सहकार्य यांचा समावेश आहे. मॅच ग्रुप आपल्या विविध सेवांमध्ये प्रोफाइलची सत्यता सुनिश्चित करणे, हानिकारक संवादांना प्रतिबंध करणे आणि वापरकर्त्यांना त्यांच्या डेटिंग अनुभवावर अधिक नियंत्रण देणे यासाठी उपयुक्त साधने आणि उपक्रम विकसित करण्यावर सातत्याने भर देत आहे.

भारतातील मॅच ग्रुपच्या प्लॅटफॉर्म्सवर प्रोफाइलची सत्यता, हानिकारक संवादांना प्रतिबंध, वापरकर्त्यांसाठी नियंत्रणाची साधने आणि प्रत्यक्ष भेटीदरम्यानची सुरक्षितता यांचा समावेश आहे.

Face Check™ आणि Photo Verification या सुविधा

टिंडरच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये Face Check™ आणि Photo Verification या सुविधांचा समावेश आहे. या सुविधांमुळे प्रोफाइलची सत्यता पडताळण्यास मदत होते. तसेच, संभाव्यतः हानिकारक संवाद ओळखण्यासाठी “Are You Sure?” आणि “Does This Bother You?” यांसारखी साधने उपलब्ध आहेत. अवांछित संवाद आढळल्यास वापरकर्ते Block, Report आणि Unmatch या सुविधांचा वापर करू शकतात. याशिवाय, Share My Date या सुविधेद्वारे वापरकर्ते आपल्या डेटिंग भेटीचे नियोजन आणि स्थानासंबंधीची माहिती विश्वासू व्यक्तींसोबत शेअर करू शकतात.

अद्ययावत अनुभवाची घोषणा

हिंजने अलीकडेच भारतातील वापरकर्त्यांसाठी अद्ययावत अनुभवाची घोषणा केली आहे. या अनुभवात विश्वास, गोपनीयता आणि परस्पर आदर यांना प्राधान्य देण्यात आले आहे. काही नवीन वापरकर्त्यांना प्रोफाइल तयार केल्यानंतर वेटलिस्टमध्ये समाविष्ट केले जाईल. यामागील उद्देश प्लॅटफॉर्मवर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने गंभीर आणि हेतुपूर्ण दृष्टिकोनातून डेटिंग करावे, हा आहे. मॅचिंग आणि लाइक करण्याची सुविधा सुरू होण्याची प्रतीक्षा करताना वापरकर्ते आपले फोटो जोडू शकतात, स्वतःची ओळख आणि अपेक्षा व्यक्त करणाऱ्या प्रॉम्प्ट्सची उत्तरे देऊ शकतात आणि आपले प्रोफाइल पडताळून घेऊ शकतात.

इतर महत्त्वाच्या सुविधांमध्ये खऱ्या व्यक्तीची खातरजमा करणारे Face Check, अवांछित ओळखी टाळण्यासाठी सुरुवातीलाच उपलब्ध असलेली Block List आणि वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी Screenshot Protection यांचा समावेश आहे.

Dating Safety Guide विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध

भारतातील हे प्रयत्न सुरक्षा शिक्षण आणि जनजागृतीपर्यंतही विस्तारलेले आहेत. टिंडरने Centre for Social Research यांच्या सहकार्याने तयार केलेले Dating Safety Guide हे मार्गदर्शक विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष डेटिंग करताना संभाव्य धोक्याची चिन्हे ओळखणे आणि सुरक्षिततेची काळजी घेणे याबाबत त्यातून मार्गदर्शन केले जाते.

School of Swipe™ या उपक्रमाद्वारे आधुनिक डेटिंगच्या विविध पैलूंबाबत व्यावहारिक मार्गदर्शन दिले जाते. तसेच, Yuvaa आणि Pink Legal यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला Let’s Talk Consent हा ऑनलाइन अभ्यासक्रम संमती आणि परस्पर आदरावर आधारित डेटिंगविषयी जागरूकता व समज वाढवण्यास मदत करतो.

ऑनलाइन विश्वास ठेवताना सावधगिरी आवश्यक

I4C चे संचालक निशांत कुमार म्हणाले, “ऑनलाइन विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फसवणूक करणारे डेटिंग अॅप्स किंवा विवाहविषयक वेबसाइट्सवर बनावट ओळख निर्माण करतात. भावनिक नात्यांचा गैरफायदा घेत विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर तातडीने पैसे हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणतात. I4C आणि गृह मंत्रालय नागरिकांना सतर्क राहण्याचे, समोरच्या व्यक्तीच्या ओळखीची योग्य पडताळणी करण्याचे, वैयक्तिक माहिती अनावश्यकपणे शेअर न करण्याचे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करतात. अशा फसवणुकीला बळी पडल्यास नागरिकांनी त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.”

ही मोहीम दिल्ली येथे आयोजित Trust & Safety India (TASI) Festival मधील मॅच ग्रुपच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर सुरू होत आहे. भारतातील सुरक्षा क्षेत्रातील विविध भागीदारांसोबत सहकार्य आणि संवाद वाढवण्याच्या मॅच ग्रुपच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये या भागीदारीला महत्त्वाचे स्थान आहे.

RBI Unchanged Repo Rate : RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश! व्याजदर कमी न झाल्याने बँक FD वर मिळणार तगडा परतावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'रोमान्स स्कॅम' म्हणजे काय आणि फसवणूक करणारे कसे जाळ्यात ओढतात?

    Ans: रोमान्स स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार डेटिंग किंवा मॅट्रिमोनियल ॲप्सवर बनावट प्रोफाइल तयार करून भावनिक नाते निर्माण करतात, विश्वास संपादन करतात आणि नंतर वैद्यकीय आणीबाणी, व्हिसा किंवा क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळतात.

  • Que: ऑनलाईन डेटिंग करताना सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या ५ मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

    Ans: संभाषण लगेच दुसऱ्या ॲपवर नेणे टाळा, प्रोफाइल व्हेरीफाय करा, व्हिडिओ कॉलद्वारे खातरजमा करा, क्रिप्टो किंवा आर्थिक गुंतवणुकीचे सल्ला नाकारा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे अथवा गिफ्ट कार्ड पाठवू नका.

  • Que: डेटिंग ॲपवर फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद प्रकार घडल्यास कुठे तक्रार करावी?

    Ans: अशी फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन नंबर 1930 वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

Web Title: Match group tinder hinge partner with i4c against romance scams ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • app
  • Central government

संबंधित बातम्या

Central Govt Employees Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने जाहीर केला 30 दिवसांचा बोनस, खात्यात येणार इतके पैसे
1

Central Govt Employees Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने जाहीर केला 30 दिवसांचा बोनस, खात्यात येणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.