Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satya Nadella : मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये करणार इतक्या अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सत्या नाडेलांनी केली मोठी घोषणा

जगात सध्या चर्चा आहे ती एआयची अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. दरम्यान याच क्षेत्रात भारताला पहिलं प्राधान्य देत मायक्रोसॉफ्टने एआयमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 07, 2025 | 09:03 PM
मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये करणार इतक्या अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सत्या नाडेलांनी केली मोठी घोषणा

मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये करणार इतक्या अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सत्या नाडेलांनी केली मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

Satya Nadella Announcement : जगात सध्या चर्चा आहे ती एआयची अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. दरम्यान याच क्षेत्रात भारताला पहिलं प्राधान्य देत मायक्रोसॉफ्टने एआयमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली असून येत्या दोन वर्षांत मायक्रोसॉफ्ट भारतातील एआयसंदर्भातल्या कौशल्य विकास व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. मंगळवारी बंगळुरूमधील मायक्रोसॉफ्ट एआय टूर कार्यक्रमात बोलताना सत्या नडेलांनी ही घोषणा केली आहे.

Supreme Court: SBI ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरणी ९४ हजार रुपये भरण्याचे आदेश

येत्या दोन वर्षांत ही सर्व गुंतवणूक मायक्रोसॉफ्टकडून केली जाणार आहे. त्याअंतर्गत भारतात नवीन डेटा सेंटर्स उभारण्याचं नियोजन कंपनीने केलं आहे. सध्या भारतात मायक्रोसॉफ्टचे तीन डेटा सेंटर्स असून येत्या दोन वर्षांत म्हणजेच २०२६पर्यंत कंपनीचं चौथं डेटा सेंटरदेखील कार्यरत होण्याची शक्यता आहे.

भारतीय तरुणांमधील एआयसंदर्भातल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या अॅडव्हांटेज इंडिया कार्यक्रमांतर्गत कंपनीकडून पुढच्या पाच वर्षांत किमान १ कोटी भारतीयांना एआयसंदर्भातील प्रशिक्षण देण्याची योजना आहे. मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल स्किल्स फॉर सोशल इम्पॅक्ट उपक्रमाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार, स्वयंसेवी संस्था व व्यावसायिक संघटनांच्या मदतीने हे प्रशिक्षण मायक्रोसॉफ्टकडून दिलं जाईल.

मायक्रोसॉफ्टनं गेल्या वर्षभरात २४ लाख भारतीयांना या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आहे. विशेष म्हणजे यात तब्बल ६५ टक्के महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. याशिवाय एकूण प्रशिक्षणार्थींपैकी ७४ टक्के प्रशिक्षणार्थी हे द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील शहरांमधील होते, अशी माहिती कंपनीच्या वतीने सत्या नडेला यांनी दिली आहे.

Walmik Karad Property: वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ED थक्क, आकड्यात सांगायचं झालं तर 1500,000,00,00,000

एआय आणि भारतातील प्रगतीविषयी बोलताना सत्या नडेला म्हणाले, “एआय क्षेत्रात भारत वेगाने अग्रस्थानाच्या दिशेनं प्रगती करत आहे. देशभरात यातून नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आम्ही एआयशी निगडित पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासासाठी गुतंवणूक जाहीर करत आहोत. ही गुंतवणूक भारताला एआय क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. या गुंतवणुकीचा देशभरातल्या तरुणांना आणि संस्थांना व्यापक प्रमाणावर फायदा होईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Microsoft invest 3 billion us dollors in india for ai infrastructure ceo satya nadella announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 08:41 PM

Topics:  

  • Artificial intelligence

संबंधित बातम्या

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?
1

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
2

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?
3

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी
4

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.