Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : AI चिटिंग प्रकरणाचा दक्षिण कोरियाला मोठा धक्का; शिक्षणमंत्र्याचा राजीनामा,देशभर खळबळ

Breaking News : दक्षिण कोरियात AI वापरून परीक्षेत कॉपी केल्याच्या प्रकरणानंतर शिक्षणमंत्री चोई क्यो-जिन यांनी राजीनामा दिला. विद्यापीठ प्रवेश परीक्षेपूर्वी घाईघाईने केलेल्या सुरक्षा उपायांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 08:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • छुप्या कॅमेऱ्याने प्रश्न टिपले आणि AI कडून मिळवली उत्तरे
  • परीक्षेपूर्वी नियमांत अचानक बदल
  • राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा लगेच स्वीकारला
Breaking News : दक्षिण कोरियामध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा ( AI ) वापर करून परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे . या वादाचे पडसाद थेट सरकारपर्यंत पोहोचले असून देशाचे शिक्षणमंत्री चोई क्यो जीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

राष्ट्राध्यक्ष ली जे म्यून्ग यांनी त्याचा राजीनामा स्वीकारला आहे . महत्वाच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या अगदी आधी गैरप्रकार रोखण्यासाठी नियमांमध्ये घाईघाईने बदल करण्यात आले . मात्र या बदलांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला याची जबाबदारी स्वीकारत शिक्षणमंत्र्यांनी लगेच आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला .

छुप्या कॅमेऱ्याने प्रश्न टिपले आणि AI कडून मिळवली उत्तरे

या संपूर्ण प्रकरणाची सुरवात राष्ट्रीय कर लेखापाल परीक्षेतील एका उमेदवाराच्या कबुलीमुळे झाली . या परीक्षेत सर्वाधिक गन मिळवलेल्या उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे मान्य केले . त्याने शरीरावर लपवलेल्या छोट्या कॅमेऱ्याच्या मदतीने परीक्षेतील प्रश्नांचे फोटो काढले .

त्यानंतर हे प्रश्न स्मार्टफोनच्या माध्यमातून AI प्रणालीकडे पाठवून उत्तरे मिळवली . या प्रकारामुळे दक्षिण कोरियाच्या परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . खास बाब म्हणजे देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या काही दिवस आधीच हे प्रकरण समोर आले . त्यामुळे सरकारची चिंता वाढली .

World News : म्यानमारच्या दुर्मिळ खनिज खाणकामाला थायलंडचा मोठा धक्का; रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी

परीक्षेपूर्वी नियमांत अचानक बदल

या घटनेनंतर दक्षिण कोरिया सरकारने विद्यापीठ प्रवेश परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या . विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात केवळ पेन्सिल आणण्याची परवानगी देण्यात आली . कपड्यांवरील बटनांमध्ये छुपे कॅमेरे लपवले जाऊ नयेत म्हणून त्यावर स्टिकर्स लावण्यात आले .

विद्यार्थ्यांचे चष्मे , घड्याळे आणि कपड्यांचीही तपासणी करण्यात आली . परीक्षा केंद्रावरील सार्वजनिक वाय फाय बंद करण्यासह मोबाईल फोन जमा करण्याचे आदेश देण्यात आले . परीक्षेदरम्यान इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित गैरप्रकाराची १११ प्रकरणे निंदवण्यात आली . मात्र ही सर्व प्रकरणे AI वापरून केलेल्या कॉपीची असल्याचे सिद्ध झालेले नाही .

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा लगेच स्वीकारला

शिक्षणमंत्री चोई क्यो जीन यांनी परीक्षेच्या तयारीत पुरेशी काळजी घेतली नसल्याची टीका स्वीकारली . शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास झाल्याचे त्यांनी मान्य केले . त्यानंतर त्यांनी राजीनामा सादर केला आणि राष्ट्राध्यक्ष ली जे म्यून्ग यांनी तो स्वीकारला .

यंदाच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी देशभरातील १३१२ केंद्रावर ५ लाख ५१ हजार ८६४ उमेदवारांनी नोंदणी केली होती . दक्षिण कोरियामध्ये विद्यापीठ प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात . त्यामुळे AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे परीक्षा व्यवस्थेसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे .

Web Title: Breaking news south korea ai exam cheating education minister resigns cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Exam News
  • Marathi News
  • South korea

संबंधित बातम्या

World News : म्यानमारच्या दुर्मिळ खनिज खाणकामाला थायलंडचा मोठा धक्का; रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी
1

World News : म्यानमारच्या दुर्मिळ खनिज खाणकामाला थायलंडचा मोठा धक्का; रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी

Amit Deshmukh: ‘विलासराव देशमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव’
2

Amit Deshmukh: ‘विलासराव देशमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव’

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप
3

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक
4

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.