
दोन्ही फंड समान अंतर्निहित इक्विटी व डेट यांच्यावर आधारित आहेत. हायब्रिड ईटीएफ इक्विटी व डेट यांच्यात समान गुंतवणूक करून समतोल वितरणाचे लक्ष्य ठेवणार आहे, तर हायब्रिड इंडेक्स फंडात ७५ टक्के गुंतवणूक इक्विटीत व २५ टक्के गुंतवणूक डेटमध्ये करून आक्रमक वितरण केले जाणार आहे. इक्विटीतील गुंतवणूक निफ्टी200 मोमेण्टम 30 इंडेक्सची पुनरावृत्ती करेल. हे स्मार्ट बीटा इक्विटी धोरण आहे. अलीकडील काळात तुलनेने अधिक चांगल्या जोखीम समायोजनाच्या माध्यमातून समभाग खरेदी करून गुंतवणूकदाराला अधिक मोबदला मिळवून देण्याचे उद्दिष्ट या धोरणापुढे असेल. डेटमधील गुंतवणूक ही ८ ते १३ वर्षांच्या कालावधीतील जी-सेक इंडेक्सवर आधारित आहे. त्यामुळे ही गुंतवणूक दीर्घकालीन असली तरीही कोणत्याही पत जोखमी दरम्यान गुंतवणूकदाराला रसातळाला जाण्यापासून वाचवण्याची तरतूद यात आहे. दोन्ही फंडांचा एनएफओ १० जुलै, २०२६ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे, तर २२ जुलै २०२६ रोजी तो बंद होणार आहे. ईटीएफ २८ जुलै, २०२६ रोजी पुन्हा खुला होणार आहे, इंडेक्स फंड २९ जुलै रोजी पुन्हा खुला होणार आहे.
“गुंतवणूकदाराच्या पैशात वाढ व्हावी व त्यात स्थैर्यही असावे हे इक्विटी व डेट यांच्यात समन्वय साधण्याचे उद्दिष्ट आहे. बाजारातील चढउतार (मोमेण्टम) हा इक्विटीशी संबंधित घटक असल्याने बाजार तेजीत असताना आक्रमक पद्धतीने समभाग खरेदी करण्याचा प्रयत्न हे हायब्रिड फंड्स करतात, तर डेटमधील गुंतवणूक ही जोखमीच्या काळात तसेच अधिक चढउतारांपासून संरक्षणाची तजवीज असते,” असे मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या ईटीएफ प्रोडक्ट विभागाचे प्रमुख तसेच फंड व्यवस्थापक सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले “दोन्ही फंडांमध्ये इक्विटी व डेट यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वेगवेगळे आहे. ईटीएफचे लक्ष्य समतोल दृष्टीकोन हे आहे, तर इंडेक्स फंडाचे लक्ष्य आक्रमक हायब्रिड गुंतवणूक हे आहे. गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम पत्करण्याच्या तयारीनुसार अनुकूल हायब्रिड फंडाची निवड करू शकतात.”
इक्विटी व डेट या दोन्हींमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा आढावा मासिक तत्त्वावर घेतला जाणार आहे, तर अंतर्निहित इक्विटी आधारित पोर्टफोलिओची वर्षातून दोनदा पुनर्रचना केली जाणार आहे. अंतर्निहित निर्देशांकांद्वारे इक्विटी व डेट यांची निवड, मूल्यमापन, फेरसंतुलन यांच्यासाठी निश्चित पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे, विवेकाधीन निर्णयाद्वारे व्यवस्थापित हायब्रिड फंडांच्या तुलनेत, या फंडांमध्ये वितरणातील निष्पत्तीचा अंदाज अधिक चांगला बांधणे शक्य होते. हायब्रिड ईटीएफ शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) होणार असल्याने, एक वर्षाहून अधिक काळ हातात ठेवलेल्या समभागांवर, प्रचलित कर कायद्यांनुसार, दीर्घकालीन भांडवली नफा कर लावला जाऊ शकतो. शिवाय, गुंतवणूकदारांना बाजाराच्या कालावधीत रिअल टाइम तत्त्वावर इंट्राडे किमतींना समभाग खरेदी करण्याची व विकण्याची मुभा असेल.
एनएफओदरम्यान किमान प्रारंभिक गुंतवणुकीची रक्कम ५,००० रुपये (पाच हजार रुपये) असेल, त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. इटीएफ व इंडेक्स फंडाचे व्यवस्थापन श्रीमती एकता गाला व श्रीमती प्रणवी कुलकर्णी करणार आहेत.