Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 वर्षांत 10 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा संसदेत मोठा दावा!

एनडीए सरकारच्या काळात केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत 12 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या आहेत. असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. ज्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहाला माहिती देताना हा दावा केला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 31, 2024 | 09:09 PM
10 वर्षांत 10 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा संसदेत मोठा दावा!

10 वर्षांत 10 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा संसदेत मोठा दावा!

Follow Us
Follow Us:

युपीए सरकारच्या २००४ ते २०१४ या काळात केवळ २ कोटी नोकऱ्यांची निर्मिती झाली. मात्र, एनडीए सरकारच्या काळात केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत 12 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या आहेत. असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. ज्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहाला माहिती देताना हा दावा केला आहे. विरोधी पक्षांनी रोजगाराचा मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर रोजगाराच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

राहुल गांधींच्या आरोपांना सडेतोड उत्तर

केंद्रात २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस आणि मित्र पक्षांचे यूपीए सरकार सत्तेत होते. आपल्या दहा वर्षांच्या काळात यूपीए सरकारने केवळ 2 कोटी नोकऱ्या निर्माण केल्या. याउलट एनडीए सरकारने आपल्या १० वर्षांच्या काळात त्यापेक्षा पाच पट अधिक अर्थात 10 कोटी अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या संसदेत केलेल्या आरोपाचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी सरकारने अर्थसंकल्पात दोन राज्यांसाठीच प्रकल्प जाहीर केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा : ८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले… वाचा सविस्तर!

सरकारने प्रत्येक क्षेत्रात तरतूद वाढवली

सरकारने प्रत्येक क्षेत्रात आर्थिक तरतूद वाढवली ​​आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात युपीए सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी 0.30 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती आता 1.52 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरकारने शिक्षण आणि रोजगारासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची अधिक तरतूद केली आहे. महिला आणि मुलींसाठी सरकार 3.27 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. 2013-24 या आर्थिक वर्षात या क्षेत्रात 0.96 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. आरोग्य क्षेत्रासाठी सरकार 1.46 लाख रुपये खर्च करणार आहे. अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.

हेही वाचा : लवकरच होणार ‘या’ सरकारी बँकेचे खासगीकरण; केंद्र सरकारकडून प्रक्रियेला गती!

बेरोजगारीच्या दरात मोठी घट

2017-18 ते 2022-23 या पाच आर्थिक वर्षात देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घट झाली आहे. देशातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर 2017-18 मधील 17.8 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 10 टक्क्यांवर आला आहे. महिला कामगारांचा सहभाग वाढला आहे. महिलांमधील बेरोजगारीचा दर 2017-18 या आर्थिक वर्षातील 6 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे.

Web Title: More than 10 crore jobs provided in 10 years finance minister nirmala sitharaman big claim in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 09:09 PM

Topics:  

  • Finance Minister
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Modi Cabinet Reshuffle: अमित शाह देशाचे नवे उपपंतप्रधान? मोदी मंत्रिमंडळात सर्वात मोठी ‘महासर्जरी’
1

Modi Cabinet Reshuffle: अमित शाह देशाचे नवे उपपंतप्रधान? मोदी मंत्रिमंडळात सर्वात मोठी ‘महासर्जरी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.