८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले... वाचा सविस्तर!
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू केला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अर्थसंकल्प सादर होण्याआधी याबाबत अनेक यंदाच्या अर्थसंकल्पात ८ व्या वेतन आयोगासाठी तरतूद केली जाणार असल्याचे आडाखे बांधले जात होते. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता तुम्ही देखील आठवा वेतन लागू होण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी वाचून तुमचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही.
राज्यसभा खासदारांच्या प्रश्नाला अर्थराज्यमंत्र्यांचे उत्तर
सध्याच्या घडीला संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, यात राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन आणि जावेद अली खान यांनी अर्थमंत्र्यांना ८ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न विचारला आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारकडून काय पावले उचलली जात आहे. असे या दोन्ही खासदारांनी अर्थमंत्र्यांना विचारले होते. यावर बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेच्या सभागृहाला माहिती देताना सांगितले आहे की, “सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही.”
हेही वाचा : लवकरच होणार ‘या’ सरकारी बँकेचे खासगीकरण; केंद्र सरकारकडून प्रक्रियेला गती!
कधीपासून लागू होणे अपेक्षित आहे?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. दर 10 वर्षांनी सरकार नवीन वेतन आयोग लागू करते. 7 व्या वेतन आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2014 मध्ये करण्यात आली होती. तर त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या होत्या. या आधारावर 1 जानेवारी 2026 ही 8 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी निश्चित तारीख मानण्यात आली आहे.
हेही वाचा : बांधकाम व्यवसायाला “अच्छे दिन”, सळईचे दर नरमले; घर बांधायचंय… मग आत्ताच ठेवा मागवून!
अनेक दिवसांपासून होतीये मागणी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ८ वा वेतन आयोग लागू करण्याची मागील केली जात आहे. अलीकडेच रेल्वे कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी ८ व्या वेतन आयोगाच्या मागणीबाबत कॅबिनेट सचिवांना पत्रही लिहिले आहे. याशिवाय अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे वारंवार ८ व्या वेतन आयोगाची मागणी लावून धरली आहे.