
मुंबई विमानतळाचा नवा विक्रम! (Photo Credit - X)
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी सीएसएमआयएवरून एकूण १,७०,४८८ प्रवाशांनी विमान प्रवास केला, ज्यामध्ये १,२१,५२७ प्रवाशांनी देशांतर्गत मार्गांवर प्रवास केला, तर ४८,९६१ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवास केला. हा नवीन विक्रम ११ जानेवारी २०२५ रोजी एका दिवसात स्थापित करण्यात आलेल्या १,७०,५१६ प्रवाशांच्या सर्वोच्च प्रवासी वाहतूकीइतका ठरला. सीएसएमआयएने ८६,४४३ प्रवाशांचे आगमन देखील केले, तसेच त्याच दिवशी ८४,०४५ प्रवाशांनी मुंबईवरून निर्गमन केले.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (एटीएम) संदर्भात सीएसएमआयएने ७५५ देशांतर्गत फ्लाइट्स आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर २८१ फ्लाइट्सच्या माध्यमातून १,०३६ एटीएमची पूर्तता केली. विमानतळ कार्यसंचालनामध्ये जवळपास ५२० फ्लाइट्सचे आगमन झाले, तर ५१६ फ्लाइट्सनी विमानतळावरून उड्डाण घेतले.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या एकूण पॅसेंजर मूव्हमेंट्समध्ये देशांतर्गत मार्गांवर दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद व कोलकाता अशा शहरांकडे सर्वोच्च प्रवासी विमान वाहतूकीची नोंद झाली, तर आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये दुबई, अबु धाबी, लंडन हीथ्रो, दोहा व जेदाह अशा गंतव्यांसाठी मोठी मागणी दिसण्यात आली.
सीएसएमआयएने सुरक्षितता, कार्यक्षमतेच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक उत्साहित करण्याप्रती प्रयत्न सुरू ठेवले. डिजिटल-केंद्रित उपक्रमांनी उच्च विमान वाहतूक असलेल्या दिवसांमध्ये विनासायास प्रवासाची खात्री घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एअरपोर्टने सुधारित सेल्फ-बॅगेज ड्रॉप (एसबीडी) युनिट्स व सेल्फ-चेक-इन किओस्क्स, तसेच व्यापक डिजियात्रा व एफटीआय-टीटीपी अवलंबनासह आपल्या डिजिटल पायाभूत सुविधेमध्ये वाढ केली आहे, ज्यासह टर्मिनल्सवर त्वरित प्रवासी प्रक्रियेची खात्री घेत आहे. या सर्व सुविधांसह अपग्रेडेड एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (एओसीसी)ने देखील रिअल-टाइम देखरेख व भागधारकांमधील समन्वय प्रबळ केला आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून वाढत्या आकारमानांची कार्यक्षमपणे हाताळणी करण्याप्रती सीएसएमआयएची क्षमता दिसून येते, ज्याला प्रबळ यंत्रणा आणि सुव्यवस्थित प्रक्रियांचे पाठबळ आहे. सुरक्षितता, वेळेवर कार्यसंचालन व प्रवाशांना सुलभ सुविधा यांवर स्थिरपणे लक्ष केंद्रित करत एअरपोर्ट मापदंड स्थापित करत आहे, जे कार्यक्षम व प्रवासी-केंद्रित विमानतळ व्यवस्थापनाच्या भविष्याला आकार देत आहेत.