Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बल्ले बल्ले… NSE IPO चा बाजारात धुमाकूळ! ग्रे मार्केटमध्ये ₹300 चा प्रीमियम; सरकारी विमा कंपन्यांना जॅकपॉट

NSE IPO GMP Update : देशातील सर्वात मोठ्या NSE आगामी IPO ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनलिस्टेड मार्केट आणि Grey Market मध्ये NSE च्या शेअरचा प्रीमियम तब्बल ₹३०० पर्यंत गेला आहे. या तुफान तेजीमुळे सरकारी विमा कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • NSE IPO चा बाजारात धुमाकूळ!
  • ग्रे मार्केटमध्ये ₹300 चा प्रीमियम
  • सरकारी विमा कंपन्यांना जॅकपॉट
NSE IPO GMP Update : देशातील सर्वात मोठ्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज NSE च्या आगामी IPO ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या IPO ला गेल्या आठवणड्यात सेबीची मुंजीर मिळाली होती. IPO ची इश्यू किंमत आणि लिस्टिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही, पण ग्रे मार्केटमध्ये या IPO ला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनलिस्टेड मार्केट आणि ग्रे मार्केटमध्ये NSE च्या शेअरचा प्रीमियम स्टॉक प्रति शेअर ₹150-₹180 वरून वाढून ₹280-₹300 झाला आहे. या तुफान तेजीमुळे NSE मध्ये मोठी हिस्सेदारी असलेल्या LIC आणि GIC सारख्या सरकारी विमा कंपन्यांना बराच फायदा मिळणार आहे. नेमकी काय आहे परिस्थिती ? ( NSE IPO GMP Update ) 

Corporate Mitra Launch : छोट्या व्यावसायिकांची बल्ले-बल्ले! केंद्र सरकारकडू खास भेट; MSME क्षेत्राला मिळणार व्यावसायिक मदत

NSE चे शेअर्स आता अनलिस्टेड मार्केटमध्ये प्रति शेअर ₹2,000 वर ट्रेड करत आहेत. अनलिस्टेड किंमत म्हणजे लिस्टिंगपूर्वी कंपनीच्या विद्यमान शेअर्सचा व्यवहार ज्या किमतीवर होतो ती किंमत, तर GMP म्हणजे IPO किंमत किंवा अंदाजित इश्यू किंमतीपेक्षा जास्त असलेला तो प्रीमियम जो गुंतवणूकदार लिस्टिंगपूर्वी शेअर्ससाठी देण्यास तयार असतात.

सरकारी विमा कंपन्यांना मोठा फायदा

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार NSE IPO साठी प्रति शेअर प्राईज बँड ₹१,८०० इतका असेल. प्रस्तावित IPO मध्ये ४० दशलक्ष शेअर्स विकून पाच सरकारी विमा कंपन्या मोठा नफा कमवतील. याचा अंदाज जवळ जवळ ₹७,२०० कोटींचा भरीव नफा मिळण्याची अपेक्षा आहे. या यादीत जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आघाडीवर आहे. त्यानंतर न्यू इंडिया अॅश्युरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया आणि ओरिएंटल इन्शुरन्स यांचा नंबर लागतो.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया या एक्सचेंजच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी होत्या. या कंपन्यांनी ₹६.८ कोटींना NSE चे शेअर्स खरेदी केले आणि आता त्यांना IPO मधून दुसऱ्या तिमाहीत भरीव नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

LIC आपले शेअर विकणार नाही

NSEची सर्वात मोठी भागधारक असलेली LIC आपले शेअर्स विकणार नाही. तिचा १०.७२% हिस्सा आहे. या पाच विमा कंपन्यांचा एकत्रित हिस्सा अंदाजे ६.७% वरून ५.१% पर्यंत कमी होईल.

IPO बाबत

NSE IPO हा पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ असणार आहे. विद्यमान भागधारक त्यांच्या हिश्श्याच्या अंदाजे ६% म्हणजेच १४८.९ दशलक्ष शेअर्सपर्यंत विक्री करतील. मसुदा दस्तऐवजानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI IPOमध्ये २४.८ दशलक्ष शेअर्सपर्यंत विक्री करणार आहे, तर एमएस स्ट्रॅटेजिक (मॉरिशस) लिमिटेड १६ दशलक्ष शेअर्सपर्यंत विक्री करेल.
हा एक OFS असल्यामुळे, यातून मिळणारा निधी NSE कडे न जाता, ज्या विद्यमान गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आहेत त्यांना मिळणार आहे. हा इश्यू १५ सप्टेंबर रोजी खुला होण्याची आणि २४ व २५ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात लिस्टेड होण्याची शक्यता आहे. जर यातून अंदाजे ₹३०,००० कोटी उभारले गेले, तर NSE ऑक्टोबर २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाच्या ₹२७,८५८.७५ कोटींच्या IPOने उभारलेला विक्रम मोडीस काढेल.

Old Monk प्रेमींना मोठा धक्का! महाराष्ट्रातील विक्रीवरील Ban कायम; Bombay High Court चा थेट नकार

Web Title: Nse ipo gmp soars to 300 rupees big gains for public sector insurance companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Insurance Policy
  • IPO
  • NSE

संबंधित बातम्या

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?
1

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.