Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parle License Suspended : पारले कंपनीला मोठा दणका! FDA च्या धाडीत सापडली एक्सपायर्ड Frooti अन् Appy; परवाना निलंबित

Parle License Suspended : प्रसिद्ध 'पारले' कंपनीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. एफडीएच्या पथकाने टाकलेल्या धाडीत मुदत संपलेल्या फ्रूटी, ॲपीचा मोठा साठा आढळून आल्याने कंपनीचा परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 15, 2026 | 12:35 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पारले कंपनीला मोठा धक्का!
  • FDA च्या धाडीत एक्सपायर्ड Frooti अन् Appy
  • थेट केला परवाना निलंबित
Parle License Suspended : देशभरात FDA सध्या अलर्ट मोडमध्ये आहे. आज नेमकी कोणावर धाड टाकली जाते. त्यात कोणाचा नंबर लागतो असा प्रश्न प्रत्येकालाच पडत असेल. अशीच एक धाड लोकप्रिय कोल्डड्रिंकच्या गोदामावर पडली. फ्रुटी आणि अॅप्पी फिझ यांसारख्या लोकप्रिय पेयांची निर्मिती करणाऱ्या पार्ले अॅग्रोच्या मुंबईतील गोदामावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात मोठ्या प्रमाणात मुदत संपलेला खाद्यपदार्थ आढळून आले आणि तिथेच या कंपनीला मोठा धक्का बसला. यानंतर, अधिकाऱ्यांनी सुमारे ९९,९७० मुदत संपलेला माल जप्त केला आणि गोदामाचा परवाना देखील निलंबित ( Parle License Suspended ) केला. कारवाईत नेमकं काय उलघडलं?

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

ही कारवाई एफडीएच्या मुंबईतील सुरू असलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी गोदाम सील केले असून तेथून मालाची निर्यात किंवा विक्री करण्यास बंदी घातली आहे.

गोदामात काय आढळले?

महाराष्ट्र एफडीएच्या पथकाने मुंबईतील चेंबूर येथील पार्ले ॲग्रोच्या वेलोसिटी एक्सप्रेस गोदामावर छापा टाकला. हे गोदाम एल. यू. गडकरी मार्गावरील प्रयाग नगर, वाशी नाका परिसरात आहे. तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना फ्रुटी, ॲपी फिझ आणि कँडी ज्यूसच्या मुदत संपलेल्या अनेक बॅचेस आढळल्या. आता या वस्तूंच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाचे एकूण किंमत अंदाजे ९९,९७० रुपये इतकी आहे.

किती तास सुरु होती कारवाई?

माध्यमांच्या वृत्तानुसार, FDA ची कारवाई १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी, १४ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत एफडीएचे आठ अधिकारी सहभागी होते. त्यांनी मुदत संपलेला माल जप्त केला आणि गोदाम सील केले. उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली.

परवाना का निलंबित करण्यात आला?

या कारवाईनंतर, एफडीएने गोदामाचा अन्न व्यवसायाचा परवाना निलंबित केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील सूचना मिळेपर्यंत या जागेतून कोणत्याही खाद्यपदार्थाची किंवा पेयांची विक्री किंवा वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अन्न सुरक्षा आणि मुदत संपलेल्या उत्पादनांची विक्री किंवा पुरवठा यावर सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

लोकांनी मुदत संपलेली फ्रुटी पिली का?

जप्त केलेला मुदत संपलेला साठा विक्रीसाठी बाजारात पोहोचला होता की ग्राहकाने खरेदी केला होता, हे अहवालात नमूद केलेले नाही. एफडीएने सध्या केवळ या साठ्याची विक्री आणि वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे, ग्राहकांनी या घटनेबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी पुढील माहितीची वाट पाहावी.

बहुतांश ठिकाणी कारवाया

पार्ले ॲग्रोच्या गोदामावरील ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा महाराष्ट्र एफडीए मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करत आहे. यापूर्वी, १२ ऑगस्ट रोजी, डोमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सचे अन्न व्यवसाय परवाने देखील निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे आता या सगळ्या धाडीधडकीत प्रत्येकाने आपले परवाने सुरक्षित राहावे असं वाटत असेल तर त्यासाठी नियमावलीचं पालन लगेच सुरु करणं आवश्यक आहे.

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद

Web Title: Parle license suspended fda finds expired frooti and appy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Business News
  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Food License
  • Marathi News
  • Parle-G
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?
1

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?
2

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद
3

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक
4

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.