
Share Market Penny Stock ( सौजन्य - सोशल मीडिया )
हा शेअर आहे सेक्सरिया फायनान्स लि. बुधवारी बाजार उघडताच बीएसईवर सेक्सरिया फायनान्स लि.चा शेअर १० रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत १५०% वाढला. याचा अर्थ, त्याने गुंतवणूकदारांना दीडपट रिटर्न मिळाला. जर कोणी या स्टॉकमध्ये १,००,००० रुपये गुंतवले असते, तर ती रक्कम एका दिवसात २,५०,००० रुपये इतकी झाली असती.
या कंपनीच्या शेअर्समधील वाढीचे कारण म्हणजे शेअर बाजारात या शेअरचं झालेलं लिस्टिंग. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE ने एका नोटमध्ये म्हटले आहे की, कंपनीचे शेअर्स बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ पासून शेअर बाजारात लिस्टींग होतील. यासोबतच, कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू होईल.
कंपनीच्या शेअर्सचा समावेश ‘XT’ ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. पहिल्या १० ट्रेडिंग दिवसांसाठी, तिचे शेअर्स केवळ ‘ट्रेड-फॉर-ट्रेड’ सेगमेंटमध्ये उपलब्ध असतील. याचा अर्थ असा की, गुंतवणूकदार केवळ डिलिव्हरी-आधारित ट्रेडिंग करू शकतील, इंट्राडे ट्रेडिंग नाही.
कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, ईश्वरशक्ती होल्डिंग्ज अँड ट्रेडर्स लिमिटेड IHTL चा साखर व्यवसाय विभक्त करून सेक्सरिया फायनान्स लिमिटेडमध्ये विलीन करण्यात आला आहे. या बदलाचा एक भाग म्हणून, IHTL च्या भागधारकांना सेक्सरिया फायनान्स लिमिटेडचे शेअर्स ७:१ या प्रमाणात वाटप करण्यात आले आहेत. कंपनीचे बाजार भांडवल आता २५२ दशलक्ष रुपयांपर्यंत वाढले आहे.
( Desclaimer : या विश्लेषणात दिलेले सल्ले वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकरेज फर्मचे आहेत, Navrashtra चे नाहीत. आम्ही गुंतवणूकदारांना सल्ला देतो की कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण शेअर बाजारातील परिस्थिती झपाट्याने बदलू शकते. )