Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! पेट्रोल भरायला निघताय? UPIवर अवलंबून राहू नका…

Petrol Pump UPI MDR Charges: 15 ऑक्टोबर 2026 पासून ₹2,000 पेक्षा जास्त काही UPI व्यापारी व्यवहारांवर MDR लागू होणार आहे. सर्वसाधारण P2M व्यवहारांसाठी हा दर 0.4% असून, इंधनासारख्या काही श्रेणींसाठी ₹5 चा फ्लॅट MDR लागू होणार असल्याचे वृत्त आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 11:23 AM
Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 15 ऑक्टोबरपासून ₹2,000 पेक्षा जास्त पात्र UPI व्यापारी व्यवहारांवर MDR लागू होणार आहे.
  • इंधन व्यवहारांसाठी ₹5 MDR लागू होणार असल्याचे वृत्त आहे; हा चार्ज ग्राहकांवर थेट लावला जाणार नाही.
  • पेट्रोल पंप डीलर्सनी विरोध करत, ₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंट न स्वीकारता कॅश घेण्याचा इशारा दिला आहे.
 

Petrol Pump Operators on UPI MDR Charges: पेट्रोल भरायला जाताय? मग जरा थांबा आणि ही बातमी पूर्ण वाचा. कारण आता पेट्रोल पंपावर UPI ने पैसे दिले तर कदाचित तुमचा पेमेंट घेतला जाणार नाही. मुंबईतल्या पेट्रोल पंप मालकांनी थेट इशारा दिला आहे की आम्ही UPI बंद करणार. फक्त मुंबईतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात हाच विषय तापला आहे.

नेमकं काय झालंय?

तर सरकारने एक नवीन नियम आणलाय. 2000 रुपयापेक्षा जास्त UPI पेमेंट केलं तर दुकानदाराला किंवा ज्याने पैसे घेतले त्याला जवळपास 5 रुपये MDR म्हणजे Merchant Discount Rate द्यावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक 2000 च्या वरच्या व्यवहारामागे 5 रुपये कट होणार. 5 रुपये कमी वाटतील, पण पेट्रोल पंपावर दिवसभरात शेकडो लोक पेट्रोल भरतात. प्रत्येकाकडून 5 रुपये गेले तर दिवसाचा हिशोब हजारो रुपयात जातो. महिन्याचा हिशोब केला तर खूप मोठा भुर्दंड पडतो. त्यामुळे पेट्रोल पंप डीलर्सनी सरळ सांगितलं आहे, जर हा 5 रुपयाचा चार्ज लागणार असेल तर आम्ही 2000 रुपयाच्या वर UPI घेणारच नाही. तुम्हाला कॅश द्यावी लागेल. Petrol Pump UPI MDR Charges:

15 ऑक्टोबरपासून बंद?

मुंबईतल्या पंप चालकांनी सरकारला सांगितलं आहे की आम्हाला या MDR मधून वगळा. जर आमचं ऐकलं नाही तर 15 ऑक्टोबरपासून आम्ही 2000 रुपयाच्या वरचे सगळे UPI पेमेंट बंद करून टाकू.म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर जर तुम्ही 2500 रुपयाचं पेट्रोल भरलं आणि UPI करायला गेलात तर पंपवाला घेणार नाही. तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतील. त्यामुळे आता पासूनच खिशात थोडी कॅश ठेवायची सवय लावा.

पंप मालकांचं म्हणणं काय आहे?

पंप मालकांचं म्हणणं अगदी साधं आहे. ते म्हणतात की आम्हाला पेट्रोल आणि डिझेल विकून आधीच खूप कमी कमिशन मिळतं. आम्ही कित्येक वेळा सरकारकडे कमिशन वाढवा म्हणून मागणी केली, पण सरकारने काहीच केलं नाही.

Business Success Rules : व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘हे’ नियोजन आवश्यक! वर्किंग कॅपिटल आणि नेटवर्क बिल्डींग कसे कराल?

आधीच नफा कमी आणि त्यात आता UPI वर पण पैसे कट होणार असतील तर आम्ही जगायचं कसं? आमच्या खिशातूनच हे पैसे जाणार आहेत. त्यामुळे हा चार्ज आम्हाला परवडणारा नाही.फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्सचे प्रवक्ते मोंटी सहगल यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं की, “2000 रुपयाच्या वरच्या पेमेंटवर जर सवलत दिली नाही तर आम्ही UPI घेणारच नाही.” कर्नाटकमधल्या डीलर्सनी पण केंद्र सरकारला पत्र लिहून या चार्जमधून वगळा अशी मागणी केली आहे.

सरकारमधूनच विरोध

विशेष म्हणजे या निर्णयाला विरोध फक्त पंप मालकच नाही तर सत्तेत असलेल्या पक्षातून पण होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग सेलने पण या निर्णयाला विरोध केला आहे.

उद्योग सेलचे प्रदेश सरचिटणीस मनीष कोंडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचा विचार करा. UPI वर चार्ज लावला तर डिजिटल इंडिया कसा होणार? लोकांनी ऑनलाईन पेमेंट करायचं की नाही? व्यापाऱ्यांवर असा भार टाकू नका.

Govt Tax Revenue Surge : सरकारी खजिना तुडुंब भरला! तुमच्या खिशातून काढलेला कर कुठे खर्च होतो? जाणून घ्या पूर्ण गणित

केंद्र सरकारकडे याबद्दल पाठपुरावा करा.खरं तर सरकार एकीकडे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे त्यावरच चार्ज लावते, हे लोकांना पचत नाहीये.त्यामुळे आता बघावं लागेल की सरकार हा निर्णय मागे घेते का? पण तोपर्यंत तुम्ही पेट्रोल भरायला जाताना खिशात रोख पैसे ठेवाच. नाहीतर पंपावर वाद व्हायचा.

Web Title: Petrol pump upi mdr charges 2000 october 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • cashless
  • online payment
  • petrol pump
  • UPI payment

संबंधित बातम्या

LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली
1

LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात
2

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!
3

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!

सांगता काय? UPI Transactions वर डबल दणका… 2000 पेक्षा जास्तच्या MDR वर लागू होणार 18 % GST
4

सांगता काय? UPI Transactions वर डबल दणका… 2000 पेक्षा जास्तच्या MDR वर लागू होणार 18 % GST

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.