Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्ग MIDC मध्ये येणार फार्मा उद्योग, कोकणवासीयांना मिळणार रोजगार

सिंधुदुर्गामधील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाणार आहे. एमआयडीसीमध्ये फार्मा उद्योग येणार आहे. यासाठी सरकारने मोठी जमीन राखून ठेवली आहे. या उद्योगांमुळे कोकणवासीयांना रोजगार मिळणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 02, 2024 | 04:22 PM
सिंधुदुर्ग MIDC मध्ये येणार फार्मा उद्योग, कोकणवासीयांना मिळणार रोजगार
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्गामध्ये एमआयडीसी उभी करून तेथील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी सरकारने या प्रकल्पासाठी ११,००० एकर जमीन राखून ठेवली आहे आणि हा प्रकल्प एमआयडीसी अंतर्गत असेल. जिल्हा सिंधुदुर्ग (ता. दोडामार्ग) येथील आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यासह देशभरातील औषध निर्माण व वैद्यकीय यंत्रसामग्री उत्पादक हजर होते.

रोजगारामुळे शहरातले व इतर राज्यातील स्थलांतर कमी होईल- दीपक केसरकर

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणामध्ये इंडस्ट्री येत असताना आमचे काही लोक त्याला विरोध करतात. पण आता ही मानसिकता बदलली आहे. दीपक केसरकर यांनी जो आता पुढाकार घेतला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मेडिकल डिवाइस तयार करण्यासाठी आपल्याला कोणतीही मदत लागणार असेल, तर ती आपण देऊ. फार्मामधील जेवढे लोक कोकणाकडे येतील त्यांचे आम्ही स्वागत नक्कीच करू.

सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या आणि सागरी समुद्राने संपन्न असा आहे. आरोग्यदायी वातावरण, शून्य प्रदूषण आणि सहकार्य करणारी लोक आहेत. तसेच गोवा राज्य जवळ असणे हे औद्योगिक उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या कोकणातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याचे शहरातले व इतर राज्यातील स्थलांतर कमी होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक दृष्ट्या संपन्न अशी जिल्ह्यामधील जागा आहे. त्या ठिकाणची जागा ही उंच व सखल स्वरूपात आहे. ती जागा सरळ करून देण्याचे काम एमआयडीसीचे आहे. उद्योजकांना सर्व सुखसोयी एमआयडीसीकडून पुरविल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली. याप्रसंगी एमआयडीसीचे अधिकारी, मोठमोठ्या फार्मा कंपनीच्या मालक व उद्योजक आदींची उपस्थिती होती.

कोकणाचा विकास नक्कीच होणार!

शिवसेना प्रवक्ता ॲड. सुशीबेन शाह म्हणाल्या सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय सुंदर आहे. आपण जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र स्थापन केले असून आता फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदार हे देखील जोडले गेले आहेत. त्यामुळे कोकणाचा विकास हा नक्कीच होणार आहे.

Web Title: Pharma industry will come in sindhudurg midc konkan people will get employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 04:22 PM

Topics:  

  • Kokan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.