Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये; PM Kisan योजनेच्या हप्त्यापूर्वी मोठी बातमी! असे तपासा ताजे अपडेट

PM Kisan Yojana 24th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यापूर्वी लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नियमांनुसार अडकेलेले मागील हप्ते आणि प्रलंबित e-KYC पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना यावेळेस २,००० ऐवजी थेट ४,००० रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 09, 2026 | 04:14 PM
'या' शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये ( सौजन्य - सोशल मीडिया )

'या' शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये
  • PM Kisan योजनेच्या हप्त्यापूर्वी मोठी बातमी
  • असे तपासा ताजे अपडेट
PM Kisan Yojana 24th Installment : शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचा 23 हफ्ते वितरित झाले आहेत. आता शेतकरी 24 व्या हफ्त्याची आतुरतेने वाढ पाहत आहेत. ही प्रतिक्षा आता कधी संपणार याबाबत कृषी मंत्रालयाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पण तसं असलं तरीही 24 वा हफ्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत मिळेल असं बोललं जात आहे. या हफ्त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. पण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेत थेट 4000 मिळणार आहेत? सविस्तर जाणून घेऊयात. ( PM Kisan Yojana 24th Installment )

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 4000?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी असाल आणि तांत्रिक समस्येमुळे तुमचा २३ वा हप्ता मिळाला नसेल, तर त्या हप्त्याची रक्कम २४ व्या हप्त्यात येऊ शकते. याचा अर्थ असा की, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹४,००० मिळू शकतात. यामध्ये एक अपवादही आहे जर तुम्ही आतापर्यंत e-KYC पूर्ण केली नसेल किंवा तुमच्या बँक खात्यात काही समस्या असतील, तर तुमचे पैसे पुन्हा ब्लॉक केले जाऊ शकतात. त्यामुळे, हप्ता येण्यापूर्वी समस्यांचे निराकरण करा.

पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासावी?

पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी, खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
त्यानंतर, वेबसाइटवर दिसणाऱ्या Know Your Status या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा.
आता, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
तुम्ही ओटीपी प्रविष्ट करताच, एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये योजनेशी संबंधित नवीनतम पेमेंट आणि हप्त्यांची माहिती दिलेली असेल.

पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता कधी येईल?

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा हप्ता २० ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर वितरित होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालय हप्ता वितरित होण्याच्या काही दिवस आधी त्याची तारीख जाहीर करते. ती तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

बंपर ऑफर… इन्स्टामार्टवर Quick India Movement सेल सुरू! आयफोन, लॅपटॉप ते दैनंदिन वस्तूंवर 50 ते 90% पर्यंत मिळणार सूट

Web Title: Pm kisan yojana 24th installment 4000 rupees benefit status check ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Central government
  • PM Kisan Nidhi Yojana

संबंधित बातम्या

उद्योगांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! MSME साठी ₹10000 कोटींचा फंड; पाहा कोणाला मिळणार फायदा
1

उद्योगांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! MSME साठी ₹10000 कोटींचा फंड; पाहा कोणाला मिळणार फायदा

PM Kisan योजनेचे 2 हजार एकाच घरात बाप मुलगा दोघांनाही मिळतील? नेमका काय आहे सरकारी नियम?
2

PM Kisan योजनेचे 2 हजार एकाच घरात बाप मुलगा दोघांनाही मिळतील? नेमका काय आहे सरकारी नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.