Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील

PM Modi Red Fort Address : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाच्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि कॉर्पोरेट जगतासाठी मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. त्याचबरोबर राष्ट्राच्या सामर्थ्यासाठी शक्तिची सप्तधारा असाही उल्लेख त्यांनी केला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 15, 2026 | 01:22 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’
  • पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
  • फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील
PM Modi Red Fort Address : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यादरम्यान त्यांनी भारताला जागतिक स्तरावर मजबूत करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि कॉर्पोरेट जगतासाठी मोठी उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. येत्या दशकात किमान 50 भारतीय कंपन्यांचा फॉर्च्युन 500 मध्ये समावेश करण्यात यावा, असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी बँकांबाबतही मोठं विधान केलं आहे. नेमकं लाल किल्ल्यावर पंतप्रधानांनी काय घोषणा केल्यात सविस्तर समजून घेऊयात. ( PM Modi Red Fort Address ) 

Parle License Suspended : पारले कंपनीला मोठा दणका! FDA च्या धाडीत सापडली एक्सपायर्ड Frooti अन् Appy; परवाना निलंबित

जगातील आघाडीच्या बँकांमध्ये भारतीय बँकांचा समावेश करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताला केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवायचे नाही तर बँकिंग, फार्मा, उत्पादन, तंत्रज्ञान आणि संरक्षण यासारख्या अनेक क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे.

अव्वल ५ बँकांमध्ये भारतीय बँका असाव्यात

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात संबोधत करताना सांगितले की, भारताचे बँकिंग क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे, जगातील अव्वल ५ बँकांमध्ये किमान एक भारतीय बँक असावी, हे देशाचे ध्येय असले पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, भारताच्या बँकिंग क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे आणि आता भारतीय बँकांनी जागतिक स्तरावर आपले मजबूत स्थान निर्माण केले पाहिजे.

अव्वल ५ फार्मा कंपन्यांमध्ये भारतीय कंपनीचा समावेश

पंतप्रधान मोदींनी औषधनिर्माण क्षेत्रासाठीही एक मोठे ध्येय समोर ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, भारताने औषधनिर्माण उद्योगात लक्षणीय प्रगती केली आहे, परंतु आता जगातील अव्वल ५ औषधनिर्माण कंपन्यांमध्ये किमान एक भारतीय कंपनी असण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, भारताने जागतिक औषधनिर्माण क्षेत्रात आपले स्थान आणखी मजबूत केले पाहिजे.

VIDEO | Independence Day 2026: Addressing the nation from ramparts of Red Fort, PM Modi, says, “I want to awaken the nation, and I also want to awaken the strength of the nation. A nation is not just about the government… a nation is made up of every citizen. We often hear… pic.twitter.com/bnU1Kav4xu — Press Trust of India (@PTI_News) August 15, 2026

राष्ट्राच्या सामर्थ्यासाठी ‘शक्तिची सप्त धारा’

आपल्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासासाठी “सात शक्ती प्रवाह” म्हणजेच सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. यामध्ये उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, वेगवान शक्ती, संरक्षण शक्ती, हरित आणि नील अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर यांचा समावेश आहे.

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

Web Title: Pm modi red fort address speech fortune 500 companies top 5 indian bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • fortune
  • Marathi News
  • narendra modi

संबंधित बातम्या

Parle License Suspended : पारले कंपनीला मोठा दणका! FDA च्या धाडीत सापडली एक्सपायर्ड Frooti अन् Appy; परवाना निलंबित
1

Parle License Suspended : पारले कंपनीला मोठा दणका! FDA च्या धाडीत सापडली एक्सपायर्ड Frooti अन् Appy; परवाना निलंबित

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?
2

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?
3

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद
4

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.