(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ही कारवाई एफडीएच्या मुंबईतील सुरू असलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी गोदाम सील केले असून तेथून मालाची निर्यात किंवा विक्री करण्यास बंदी घातली आहे.
महाराष्ट्र एफडीएच्या पथकाने मुंबईतील चेंबूर येथील पार्ले ॲग्रोच्या वेलोसिटी एक्सप्रेस गोदामावर छापा टाकला. हे गोदाम एल. यू. गडकरी मार्गावरील प्रयाग नगर, वाशी नाका परिसरात आहे. तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना फ्रुटी, ॲपी फिझ आणि कँडी ज्यूसच्या मुदत संपलेल्या अनेक बॅचेस आढळल्या. आता या वस्तूंच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाचे एकूण किंमत अंदाजे ९९,९७० रुपये इतकी आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, FDA ची कारवाई १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी, १४ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत एफडीएचे आठ अधिकारी सहभागी होते. त्यांनी मुदत संपलेला माल जप्त केला आणि गोदाम सील केले. उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली.
या कारवाईनंतर, एफडीएने गोदामाचा अन्न व्यवसायाचा परवाना निलंबित केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील सूचना मिळेपर्यंत या जागेतून कोणत्याही खाद्यपदार्थाची किंवा पेयांची विक्री किंवा वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अन्न सुरक्षा आणि मुदत संपलेल्या उत्पादनांची विक्री किंवा पुरवठा यावर सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
जप्त केलेला मुदत संपलेला साठा विक्रीसाठी बाजारात पोहोचला होता की ग्राहकाने खरेदी केला होता, हे अहवालात नमूद केलेले नाही. एफडीएने सध्या केवळ या साठ्याची विक्री आणि वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे, ग्राहकांनी या घटनेबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी पुढील माहितीची वाट पाहावी.
पार्ले ॲग्रोच्या गोदामावरील ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा महाराष्ट्र एफडीए मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करत आहे. यापूर्वी, १२ ऑगस्ट रोजी, डोमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सचे अन्न व्यवसाय परवाने देखील निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे आता या सगळ्या धाडीधडकीत प्रत्येकाने आपले परवाने सुरक्षित राहावे असं वाटत असेल तर त्यासाठी नियमावलीचं पालन लगेच सुरु करणं आवश्यक आहे.
Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद

