PM मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक': केजरीवाल, राहुल गांधी, राजीव गांधींचा उल्लेख करत म्हणाले...
Nirmala Sitharaman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पांत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. शेतकरी, महिला तसेच प्रत्येक क्षेत्रासाठी काही ना काही घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना ‘GYAN’ (गरीब, युवा, अन्नदाता आणि महिला) यावर लक्ष केंद्रित केले. बजेटवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाला संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले,
The #ViksitBharatBudget2025 reflects our Government’s commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians. https://t.co/Sg67pqYZPM
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2025
“आजचा दिवस हा भारताच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. हा भारताचे स्वप्न पूर्ण करणार अर्थसंकल्प आहे. याबद्दल मी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो. तरुणांसाठी आम्ही प्रत्येक क्षेत्र खुले केले आहे. या बजेटमुळे गुंतवणूक वाढेल आणि विकास होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देश आज प्रगतीकडे, विकासाकडे वाटचाल करत आहे. या अर्थसंकल्पात खूप मोठी आणि ठोस पावले उचलण्यात आली आहेत. ”
‘बजेट’वर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इन्कम टॅक्सची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत नेलेली आहे. त्यामुळे 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा नोकरदारांना, मध्यमवर्गीय वर्गाला होणार आहे. भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे.
“शेती क्षेत्रात 100 जिल्हे ठरवून त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवली जाण्याची योजना, जलजीवन मिशन असेल. शेती क्षेत्रात विविध प्रकारची गुंतवणूक सरकारने घोषित केली आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झालेले आहे. 21 व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंयकल्प आहे. देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.
हेही वाचा: Budget 2025: बजेटमध्ये स्वस्त झाल्या ‘या’ गोष्टी ; लिस्ट बघाच
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एआय (AI) बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. एआयच्या शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करणार केले जाणार आहेत.