बजेट 2025 वर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो- टीम नवराष्ट्र/ट्विटर)
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पांत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. दरम्यान या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
LIVE | Interaction with media on #ViksitBharatBudget2025
🕐 12.57pm | 1-2-2025 📍 Mumbai.#Maharashtra #Mumbai #ViksitBharatBudget25 https://t.co/2HCkh1mHZW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2025
अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इन्कम टॅक्सची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत नेलेली आहे. त्यामुळे 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा नोकरदारांना, मध्यमवर्गीय वर्गाला होणार आहे. भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे.
“शेती क्षेत्रात 100 जिल्हे ठरवून त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवली जाण्याची योजना, जलजीवन मिशन असेल. शेती क्षेत्रात विविध प्रकारची गुंतवणूक सरकारने घोषित केली आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झालेले आहे. 21 व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंयकल्प आहे. देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बजेटमध्ये काय काय घोषणा?
शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.
हेही वाचा: Budget 2025: बजेटमध्ये स्वस्त झाल्या ‘या’ गोष्टी ; लिस्ट बघाच
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एआय (AI) बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. एआयच्या शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करणार केले जाणार आहेत.
आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. याचदरम्यान आपले स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ते प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण आता घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर गेल्या आहेत.याचपार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) २०२५ च्या अर्थसंकल्पात ‘स्वामी निधी’ची घोषणा केली आहे. या निधीचा उद्देश रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करणे आणि मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे.एकंदरित आता सर्वसामान्यांना परवडणारी घर उपलब्ध होणार आहे. काय आहे स्वामी निधी ?
हेही वाचा: खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ४०,००० रखडलेली आणि अपूर्ण घरे पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५०,००० घरे पूर्ण झाली आहेत आणि घर खरेदीदारांना त्यांच्या घरांच्या चाव्या दिल्या जात आहेत. हा प्रकल्प सरकारने तयार केलेल्या स्वामी निधी मधून तयार करण्यात आला आहे.