
Stock Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! गुंतवणूकदारांना होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर
मंगळवारी, भारत-ईयू व्यापार कराराच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बेंचमार्क निफ्टी ५० २५,१५० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३१९.७८ अंकांनी म्हणजेच ०.३९% ने वाढून ८१,८५७.४८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२६.७५ अंकांनी म्हणजेच ०.५१% ने वाढून २५,१७५.४० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ७३२.३५ अंकांनी किंवा १.२५% ने वाढून ५९,२०५.४५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
१२० हून अधिक कंपन्या त्यांचे आर्थिक निकाल बुधवार, २८ जानेवारी रोजी जाहीर करणार आहेत. एल अँड टी, मारुती सुझुकी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कोचीन शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, पाइन लॅब्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि टीव्हीएस मोटर कंपनी या कंपन्यांनी आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, टीव्हीएस होल्डिंग्ज, कोचीन शिपयार्ड, बीईएल, वेदांत, व्होडाफोन आयडिया, मारिको, भारतीय जीवन विमा महामंडळ, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, रेल विकास निगम, ओएनजीसी, पीसी ज्वेलर, विशाल मेगा मार्ट या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाच्या शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बगडिया यांनी गुंतवणूकदारांसाठी बीएसई, सीयूबी, अक्युटास केमिकल्स, टेक महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू स्टील या पाच ब्रेकआउट स्टॉक्स खरेदीची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये CUB, पारस डिफेन्स आणि NMDC यांचा समावेश आहे.