Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली संगणक अभियंत्याची फसवणूक; तब्बल 43 लाखांना घातला गंडा

ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग व आयपीओमध्ये ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंत्या तरुणाची तब्बल ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 27, 2026 | 09:59 AM
बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला

बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग व आयपीओमध्ये ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंत्या तरुणाची तब्बल ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार ५ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. मोहन शर्मासह अन्य मोबाईलधारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन गजानन देशमुख (वय २८, रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते पत्नी व मुलासह राहतात व घरून ऑनलाईन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ५ डिसेंबर २०२५ रोजी देशमुख यांच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर एक लिंक आली. ती उघडताच त्यांना व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपचा ऍडमिन मोहन शर्मा होता. तो शेअर मार्केट ट्रेडिंगबाबत मार्गदर्शन करत होता. ग्रुपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार ऍप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. किमान ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याशिवाय ट्रेडिंग करता येणार नाही, असे सांगण्यात आले.

दरम्यान, आव्हाना या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. विश्वास बसल्याने फिर्यादी व त्यांच्या आईच्या बँक खात्यांतून वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. यामध्ये येस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, ऍक्सिस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्यांचा वापर करण्यात आला. सिकंदर इंटरप्रायझेस, क्राफ्ट सिकार्ट सेलिफाय प्रा. लि., माँ श्री कामख्या इंटरप्रायझेस आणि जे. एन. ट्रेडिंग कंपनी या नावांनी खाते देण्यात आले होते.

बनावट नफा दाखवून घातला गंडा

२१ जानेवारी रोजी WAR-BURG ऍपमध्ये फिर्यादींना तब्बल ७८ लाख ७९ हजार ३१४ रुपयांचा नफा दिसू लागला. मात्र, आयपीओमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताच, ऍपवर पेडिंग आयपीओ ऑर्डर पे ६५ लाख ६४ हजार ३४० रुपये असा संदेश दिसून आला. ही रक्कम नव्याने भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेदेखील वाचा : Vikram Bhatt Fraud News: विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीचा आरोप, पोलिस तक्रार दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Web Title: Fraud in the name of share trading know what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • share market

संबंधित बातम्या

शेअर बाजारात मोठी त्सुनामी, एका दिवसात बुडाले 13 लाख कोटी रुपये; गुंतवणुकदार हवालदिल
1

शेअर बाजारात मोठी त्सुनामी, एका दिवसात बुडाले 13 लाख कोटी रुपये; गुंतवणुकदार हवालदिल

Maharashtra Politics: “… त्या पुरावेही नष्ट करू शकतात”; Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप
2

Maharashtra Politics: “… त्या पुरावेही नष्ट करू शकतात”; Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…
3

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…

Stock Market Today: 3 दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात मोठी घसरण! NIFTY 420 ने खाली, सेन्सेक्स 75,300 जवळ
4

Stock Market Today: 3 दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात मोठी घसरण! NIFTY 420 ने खाली, सेन्सेक्स 75,300 जवळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.