Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस बचत खाते आजही अनेक नागरिकांसाठी पैशांची बचत करण्याचा विश्वासार्ह पर्याय आहे. मात्र, या खात्याबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत. नियमानुसार, एका व्यक्तीला पोस्ट ऑफिसमध्ये केवळ एकच सिंगल बचत खाते उघडता येते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 16, 2026 | 03:10 PM
Post Office Savings Account Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Post Office Savings Account Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीला एकच सिंगल पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते.
  • सिंगल खात्यासोबत संयुक्त खातेही सुरू ठेवता येते.
  • संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन खातेदार असू शकतात.

Post Office Savings Account : आजही गावात असो की शहरात, बऱ्याच लोकांना पैसा ठेवायचा म्हटलं की आधी पोस्ट ऑफिसच आठवतं. बँकेचं तेवढं कळत नाही, पण पोस्ट ऑफिस जवळचं वाटतं. म्हणूनच आजही लाखो लोक पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं ठेवतात.

पण या बचत खात्याचे नियम काय सांगतात?

एका व्यक्तीला किती खाते उघडता येऊ शकतात? संयुक्त खात्याचे नियम काय आहेत? ते खुले करण्यासाठी कोणकोणत्या दस्तऐवजांची गरज लागते? जाणून घेऊयात. बऱ्याच जणांना वाटतं, एक खातं इथे, एक खातं तिथे, असं दोन-तीन खाती उघडावी. पण असं करता येतं का? हेच आज समजून घेऊ.आजही लोक पोस्ट ऑफिसलाच का मानतात? Post Office Savings Account Rules:

आजही देशातली बरीचशी मंडळी पैशांच्या बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या सेवेचा लाभ घेतात. जुन्या काळापासून पोस्ट ऑफिस चालत आलंय. विशेष म्हणजे जुन्या लोकांमध्ये पोस्ट ऑफिस बचत खात्यात पैसे ठेवण्याची सवय आजही अस्तित्वात आहे.आजोबा, आजी, आई-वडील, सगळ्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये पैसा ठेवलाय. अनेकदा याच गोष्टी वारसा हक्काने पुढच्या पिढीकडे जातात. वडिलांचं खातं बघून मुलगा पण पोस्ट ऑफिसमध्येच खातं उघडतो. आताच्या पिढीतही काही बचतप्रेमी पोस्ट ऑफिस बचत खात्याचा वापर करतात.

नवीन पोरं फोनवरून सगळं करतात, पण काहींना अजूनही पोस्ट ऑफिसचं खातं हवं असतं. पण या बचत खात्यांचेही काही नियम आहेत. काही मंडळी अनेकदा एकापेक्षा अधिक बचत खाते उघडण्याची योजना आखतात, पण नियमांनुसार ते शक्य नसते. मग काय सांगतात हे नियम? जाणून घेऊयात.

Gold Silver Price Crash: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गडगडले! किंमतीत मोठी पडझड, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?

एकट्याचं खातं – सिंगल खात्याचा नियम काय?

पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा अधिक सिंगल बचत खाते उघडणे शक्य नाही.हे लक्षात ठेवा. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये फक्त एकच सिंगल खातं उघडता येतं. दोन नाही. तीन नाही.कारण पोस्ट ऑफिसचे नियम एका व्यक्तीला फक्त एकच सिंगल बचत खाते उघडण्याची मुभा देतात. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या एका शाखेत सिंगल बचत खाते असले तर दुसऱ्या शाखेत जाऊन दुसरे खाते उघडण्याचे स्वप्न कधीच सफल होणारे नसतात.

बऱ्याच जणांना वाटतं, या गावात एक खातं आहे, दुसऱ्या गावात जाऊन दुसरं उघडू. किंवा या शाखेत आहे, दुसऱ्या शाखेत उघडू. पण असं होत नाही. तुमचं नाव सगळीकडे एकच असतं, त्यामुळे पकडलं जातं.पण सिंगल बचत खात्याच्या खातेदाराला संयुक्त बचत खाते उघडण्याची मुभा आहे.म्हणजे तुमचं एकट्याचं खातं असेल, तर तुम्ही दुसरं संयुक्त खातं पण उघडू शकता. एकंदरीत खातेदारला एकाच वेळी पोस्ट ऑफिसच्या सिंगल तसेच संयुक्त खात्याचे लाभ घेता येऊ शकते. संयुक्त खाते सुरू केल्याने सिंगल खाते बंद होत नाही.म्हणजे दोन्ही खाती एकाच वेळी चालू ठेवता येतात. एक बंद करायची गरज नाही.

संयुक्त खातं म्हणजे काय? नियम काय आहेत?

महत्वाचे म्हणजे आधीच्या नियमानुसार दोन खातेदारांना एकत्र येऊन संयुक्त खाते उघडता येत होते.आधी संयुक्त खात्यात फक्त दोनच लोक असायचे. नवरा-बायको, किंवा आई-मुलगा, असं. पण आता हे नियम बदलण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार, एका संयुक्त खात्यात तीन भागीदार राहू शकतात.आता तीन लोक मिळून एक संयुक्त खातं उघडू शकतात. म्हणजे नवरा, बायको आणि मुलगा, तिघं मिळून एक खातं.

तर हे संयुक्त खाते दोन प्रकारचे असतात. यात पण दोन प्रकार आहेत, हे लक्षात ठेवा.एका प्रकारात संयुक्त खात्यातील प्रत्येक व्यवहारासाठी सर्व भागीदारांची संमती घेणे आवश्यक असते.पहिला प्रकार – यात पैसा काढायचा असेल, टाकायचा असेल, तर सगळ्यांची सही लागेल. एकट्याला काही करता येणार नाही.

तर दुसऱ्या प्रकारात सगळ्यांच्या संमतीशिवाय त्यातील एका भागीदाराला एकट्यानेही व्यवहार करता येतात.दुसरा प्रकार – यात एकटाही माणूस जाऊन पैसा काढू शकतो, टाकू शकतो. सगळ्यांची परवानगी लागत नाही.खाते सुरू करण्यावेळी या भागीदारांना त्यांच्या खात्याचा प्रकार निवडावा लागतो.

खातं उघडतानाच ठरवावं लागतं, आपल्याला कोणता प्रकार पाहिजे. नंतर बदलता येत नाही, असं नाही, पण आधीच ठरवलं तर बरं.खातं उघडायला काय कागदपत्रं लागतात?पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते खुले करायचे असल्यास संबंधित अर्ज दाराला वैध ओळख पत्र, पत्त्याचा पुरावा तसेच पासपोर्ट साईज फोटोज् जमा करावे लागतात.

खातं उघडायला फार काही लागत नाही. फक्त तीन गोष्टी लागतात. एक – ओळखपत्र. आधार कार्ड, पॅन कार्ड, काहीही चालेल. दोन – पत्त्याचा पुरावा. तुम्ही कुठे राहता, याचा पुरावा. तीन – दोन-तीन पासपोर्ट साईज फोटो.

तसेच संयुक्त खात्यासाठी सर्व भागीदारांच्या KYC प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.संयुक्त खातं असेल तर तिघांचीही KYC करावी लागते. तिघांचेही कागदपत्रं द्यावे लागतात. तसेच आवश्यक ते इतर कागदपत्रे जमा करावे लागतात.म्हणून खातं उघडायला जायच्या आधी सगळी कागदपत्रं सोबत घेऊन जा, म्हणजे दोन-तीन चकरा माराव्या लागणार नाहीत.

Web Title: Post office savings account rules multiple accounts joint account kyc documents rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • post office
  • Savings

संबंधित बातम्या

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक
1

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट
2

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर
3

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका
4

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.