Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक

Nagpur News : नागपूरच्या बेसा-बेलतरोडी परिसरात खासदार बर्वे यांच्या अनुपस्थितीवरून नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. परिसरातील समस्या आणि खासदारांच्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून 'लापता खासदार' असा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 16, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • खासदारांच्या अनुपस्थितीवर नाराजी
  • मूलभूत सुविधांचा अभाव
  • नागपूर शहरात समावेशाची मागणी
Nagpur News : नागपूर ग्रामीणमधील बेसा-बेलतरोडी परिसर झपाट्याने विकसित होत असला, तरी या भागातील मूलभूत सुविधांची स्थिती मात्र चिंताजनक आहे. अनियोजित शहरीकरणामुळे वाढलेली लोकसंख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कथित अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

खासदार मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप करीत काही नागरिकांनी परिसरात ‘लापता खासदार’ असा फलक लावण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. वर्धा रोडलगत असलेल्या बेसा-बेलतरोडी परिसराने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. नव्या इमारती, गृहप्रकल्प आणि वाढत्या लोकवस्तीमुळे हा भाग झपाट्याने विस्तारत आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विकास झालेला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विकासाच्या दाव्यांमध्ये प्रत्यक्षातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Nagpur News : पारडी मेट्रो मार्गाच्या कामाने घेतला वेग; पायाभरणीची कामे पूर्ण; रुळ टाकण्यास सुरुवात, प्रकल्प ७८ टक्के मार्गी

खासदारांच्या अनुपस्थितीवर नाराजी

बेसा-बेलतरोडीतील समस्यांबाबत खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रत्यक्ष परिसरात येऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे, मात्र, खासदार या भागात नियमितपणे येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. २०२३ पासून नोव्हेंबर २०२६ पर्यंत त्यांनी परिसराला किती वेळा भेट दिली, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, खासदार आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करतात, याचीही अनेकांना पुरेशी माहिती नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

‘लापता खासदार ‘चा फलक लावण्याची चर्चा परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिक आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सोशल मीडिया तसेच परिसरातील चर्चामध्ये ‘लापता खासदार’ असा फलक लावण्याची कल्पना पुढे येत आहे. खासदारांनी परिसराचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात.

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..

मूलभूत सुविधांचा अभाव

परिसरातील रस्ते अरुंद असल्याने वाढत्या वाहनसंख्येचा ताण त्यांच्यावर पडत आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून, वीज आणि पाणीपुरवठ्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. उद्यानाची संख्या अत्यल्प असून सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही पुरेशी व्यवस्था नाही. विशेष म्हणजे, बांधून तयार असलेली स्मशानभूमी अद्याप कुलूपबंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठीही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागपूर शहरात समावेशाची मागणी

बेसा-बेलतरोडीतील नागरिकांच्या मते, यापूर्वीच्या खासदारांच्या कार्यकाळातही या भागाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागतो. अनेकदा ७० ते ८० किलोमीटर अंतर पार करून लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावे लागते.

याउलट नागपूर शहरातील लोकप्रतिनिधी परिसरापासून तुलनेने जवळ आहेत. त्यामुळे बेसा-बेलतरोडीचा नागपूर शहरात समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागपूरचे खासदार अनेकदा या भागात भेट देतात, मात्र ग्रामीण मतदारसंघाच्या खासदारांकडून अपेक्षित संपर्क होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.

Web Title: Nagpur besa beltarodi mp barve missing poster cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • Member Of Parliament
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?
1

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट
2

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर
3

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका
4

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.