Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

माथेरानमध्ये १६ नोव्हेंबर पासून पाणी कपात लागू होणार आहे. पाणी कपातीमुळे पाण्यावर अवलंबून असलेला माथेरान येथील हॉटेल व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. दरम्यान, माथेरान शहरात जीवन प्राधिकरण विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2026 | 02:59 PM
Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला
  • उन्हाळी पर्यटन लक्षात घेऊन पाणी नियोजन करण्याचे धोरण निश्चित
  • माथेरानमधील सर्व प्रकारचे व्यवसाय हे पाण्यावर अवलंबून
माथेरान: माथेरान शहरात पाणी कपात सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. १६ नोव्हेंबर पासून पाणी कपात लागू होणार असून प्रत्येक विभागात आठवड्यातील तीन दिवस पाणी येणार नाही, तर फक्त रविवारी कोणत्याही विभागात पाणी कपात नसेल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जाहीर केले आहे. माथेरान या पर्यटनस्थळी पाणीकपात सुरू झाली तर येथील पर्यटन धोक्यात येणार आहे. दरम्यान, माथेरान शहरात जीवन प्राधिकरण विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला असून पाण्याचे नियोजन कसे असावे? यासाठी बुधवारी माथेरानकर एकवटणार आहेत.

Tarali Pumped Storage Project: भीमाशंकरच्या जंगलानंतर तारळी खोऱ्यावर अदानीची नजर; शेती अन् पाणी वाचवण्यासाठी स्थानिकांचा एल्गार!

माथेरान शहरात येणारे पर्यटक हे दहा लाखाहून अधिक असून यावर्षी पाणी कमी प्रमाणात पडले आहे. त्यामुळे सर्व शहरांनी पाणी कपात केली असून माथेरान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये ब्रिटिश कालीन शालोट लेक असून तेथून पाणी पुरवले जाते, मात्र उल्हास नदीवरून सर्वाधिक पाणी उपसा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत असते आणि उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी कुंभे येथून नेरळ, जुम्मापट्टी, वॉटर पाईप पंप हाउस वरून माथेरान शहरात पोहचत असते. एवढा लांबचा प्रवास करून आल्याने माथेरानमध्ये पाणी महाग विकले जाते. (फोटो सौजन्य – AI Created) 

देशातील सर्वात जास्त दराने पाणी जीवन प्राधिकरणकडून विकले जाते. मात्र त्याच माथेरानमध्ये आता प्राधिकरणकडून पाणी कपात सूचित केली आहे. उन्हाळी पर्यटन लक्षात घेऊन पाणी नियोजन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. या पाणी कपातीमुळे पाण्यावर अवलंबून असलेला माथेरान येथील हॉटेल व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.

पाणी पुरवठा बंद असलेले दिवस व प्रभावित परिसर

सोमवार, बुधवार, शुक्रवार.
जुना मेरी रोड, ऑलम्पिया मेन आणि पीव्हीसी, पार्क व्यू साईट, कोतवाल नगर, संत रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, शेलार गल्ली

मंगळवार, गुरुवार, शनिवार
मुस्लीम मोहल्ला, वाल्मिकी नगर, पार्क व्हा पॉईंट नवीन, मंकी पॉईंट, दस्तुरी, बाजार पीव्हीसी, इंदिरा नगर, ऑलिंपिया एसी

बुधवारी एकत्र जमणार…!

माथेरानमधील सर्व प्रकारचे व्यवसाय हे पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पाणी कपात येथील पर्यटन व्यवसाय संपुष्टात आणणारा असल्याने सर्व ग्रामस्थांनी बुधवारी एकत्र जमून आवाज उठवण्याचा निर्णय घेऊ आणि त्यामुळे सर्वांनी व्यावसायिक यांनी देखील एकत्र यावे.- शिवाजी शिंदे, नगरसेवक

पाण्याचे नियोजन करावे.. आम्ही शहरातील नागरिक जपूनच पाणी वापरतो, पण पाण्याचे प्रति हजार लिटरचे दर पाहिले तर घाम फुटतो. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने आधी पाण्याचे नियोजन करावे आणि नंतर पाणी कपात करावे.- चंद्रकांत जाधव, व्यवसायिक

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

८०० मी. उंचीवर टँकरने पाणी नेणे अवघड

पर्यटक पाण्याचा वापर आस्त करतात. ८०० मी. उंचीवर टँकरने देखील पाणी नेता येणार नाही. उल्हास नदीवरून उन्हाळी हंगामात १८- २० तास पाण्याचा उपसा केला जातो. भविष्याचा विचार करून माथेरानमध्ये पाणी कपात जाहीर केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran water cut from november 16 water supply to remain suspended three days a week hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक
1

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर
2

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका
3

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
4

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.