Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान; म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाईचा आकडा वरच्या दिशेने झेपावतो आहे. मात्र, असे असले तरी महागाई नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 26, 2024 | 02:46 PM
महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान; म्हणाले...

महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा कसोशीचा काळ सुरु आहे. शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार देखील देशातून काढता पाय घेत आहेत. इतकेच काय तर महागाईचा आकडाही वरच्या दिशेने झेपावतो आहे. मात्र, असे असले तरी महागाई नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा – वर्षभरात 74000 टक्के परतावा, 1.65 रुपयांचा शेअर 1226 रुपयांवर; घसरणीच्या काळात जोरदार कमाई!

चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई नियंत्रणात राहील

जगात अनेक समस्या सुरू असल्याने महागाईवर दबाव आहे. पण देशातील महागाई आणि वाढ यांच्यात ताळमेळ आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई नियंत्रणात राहील. असेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले आहे. सध्याच्या घडीला हवामानातील अनिश्चितता आणि भू-राजकीय समस्यांमुळे महागाईचा आकडा लक्ष्याच्या ४ टक्क्यांच्या वर गेला आहे. मात्र, जानेवारी ते मार्च या तिमाहीत यामध्ये सुधारणा होईल. असेही ते म्हणाले आहे.

हे देखील वाचा – रतन टाटांचे पाळीव कुत्र्यावरील प्रेम…, मृत्यूपत्रात जोडले नाव; करुन गेलेत त्याच्यासाठी ‘ही’ तरतूद!

8 टक्के आर्थिक विकास दर

मुंबईत आयोजित मॅक्रो वीक 2024 ला संबोधित करताना ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि ताकद यामुळे चलनविषयक धोरण समितीला व्याजदरांव्यतिरिक्त महागाईवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. कोविड 19 चे दुष्परिणाम असूनही, आम्ही गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 8 टक्के आर्थिक विकास दर राखला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्येही ते सुमारे 7.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले आहे.

हे देखील वाचा – शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स, निफ्टी जोरदार घसरणीसह बंद; वाचा… शेअर बाजारात काय घडले?

देशांतर्गत मागणीत वाढ

दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर पुढे बोलताना म्हणाले आहे की, देशांतर्गत मागणीत वाढ होत आहे. याशिवाय देशात उत्पादनही वाढत आहे. देशात खासगी गुंतवणूकही वाढत आहे. सरकारने भांडवली खर्च वाढवणे आणि बँकांचे आर्थिक आरोग्य मजबूत ठेवण्यावर भर दिला आहे. एनबीएफसी देखील चांगली कामगिरी करत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रही गुंतवणूक वाढवून देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. कृषी क्षेत्रातील विकासामुळे ग्रामीण भागातही मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक जगात उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. असेही ते म्हणाले आहे.

Web Title: Rbi governor shaktikanta das big statement on inflation can be brought under control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Indian Economy
  • RBI governor

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
1

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली
2

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत
3

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

असीम मुनीर हे करतायेत व्यर्थीची बडबड; भारताला मर्सिडीज तर पाकिस्तानला म्हणतायेत ट्रक
4

असीम मुनीर हे करतायेत व्यर्थीची बडबड; भारताला मर्सिडीज तर पाकिस्तानला म्हणतायेत ट्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.