आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काय घडले? कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले; वाचा... सविस्तर!
आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात मोठ्या घसरणीसह शेअर बाजार बंद झाला आहे. परिणामस्वरुप, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 80000 अंकांच्या खाली घसरला आहे. याशिवाय आज मिडकॅप समभाग आणि स्मॉल कॅप समभाग देखील घसरले आहेत.
काय घडले आज शेअर बाजारात?
आज (ता.२५) शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 663 अंकांनी घसरून 79,402 अंकांवर स्थिरावला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 218 अंकांनी घसरून, 24,180 अंकांवर बंद झाला आहे. आजच्या शेअर बाजारातील घसरणीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 6 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
कोणत्या शेअरमध्ये तेजी, कोणते शेअर्स घसरले?
आज मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह बंद झाले आहे. तर 20 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर हा 18.79 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा ३.५६ टक्क्यांनी, एल अँड टी ३.०१ टक्क्यांनी, एनपीटीसी २.७३ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स २.३३ टक्क्यांनी, मारुती २.१४ टक्क्यांनी घसरले आहेत.
तेजीत असलेल्या शेअर्समध्ये प्रामुख्याने आयटीसी 2.24 टक्क्यांच्या वाढीसह, ॲक्सिस बँक 1.85 टक्क्यांच्या वाढीसह, एचयूएल 0.96 टक्क्यांच्या वाढीसह, सन फार्मा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह, आयसीआयसीआय बँक 0.53 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहेत.
हे देखील वाचा – दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!
गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान
आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 437.76 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे गेल्या सत्रात 444 लाख कोटी रुपयांजवळ होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 6 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
आज शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, तेल आणि वायू ऊर्जा, मीडिया आणि धातू क्षेत्राच्या शेअर्समध्ये झाली आहे. केवळ फार्मा आणि एफएनसीजी क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले आहे. दरम्यान, निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1071 अंकांच्या घसरणीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक 401 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)