Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI On Home Loans : होम लोन घेणाऱ्यांना होणार मोठा फायदा? रिझर्व्ह बँकेने बदलले नियम, बँकांना काय दिलेत निर्देश?

RBI On Home Loans : या पलिकडेही देशाच्या दुर्गम ग्रामीण भागांमध्ये, ग्रामीण सहकारी बँकांचं एक जाळं आहे. जे घरे, शेती आणि लहान व्यवसायांना शांतपणे वित्तपुरवठा करत आलं आहे. त्यांच्या मदतीने दुर्गमभागातील लोकांची बरीचशी स्वप्न पूर्णत्वाला येत आहे. नुकतंच रिझर्व्ह बँकेने या बँकांनासाठी खास निर्देश काढले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 01:48 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • होम लोन घेणाऱ्यांना होणार मोठा फायदा?
  • रिझर्व्ह बँकेने बदलले नियम,
  • बँकांना काय दिलेत निर्देश?
RBI On Home Loans : प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं छोटंसं का होई ना एक घरं असावं. पण बऱ्याच जणांना आपला जमापुंजीतून घर बांधणं शक्य होत नाही. त्यासाठी लोनची गरज लागते. ही लोनची गरज पूर्ण करण्यासाठी आपण बँकांकडे जातो. जेव्हा कधी आपण कर्जाचा विचार करतो, तेव्हा सगळ्या पहिले डोळ्यासमोर येतात ते SBI, HDFC बँक किंवा ICICI बँक ही नावे आठवतात. पण या पलिकडेही देशाच्या दुर्गम ग्रामीण भागांमध्ये, ग्रामीण सहकारी बँकांचं एक जाळं आहे. जे घरे, शेती आणि लहान व्यवसायांना शांतपणे वित्तपुरवठा करत आलं आहे. त्यांच्या मदतीने दुर्गमभागातील लोकांची बरीचशी स्वप्न पूर्णत्वाला येत आहे. नुकतंच रिझर्व्ह बँकेने ( RBI On Home Loans ) या बँकांनासाठी खास निर्देश काढले आहेत.

E20 Petrol: ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी? सोशल मीडियावरील दाव्यांचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य; पाहा केला खुलासा

आता, भारतीय रिझर्व्ह बँक या बँकांना अधिक लवचिकता देण्यासाठी आणि सोबतच त्यांच्या जोखीम व्यवस्थापन पद्धती अधिक कठोर करुन बळकटी देण्याचं प्रयोजन करत आहे. आरबीआयने ग्रामीण सहकारी बँकांसाठी एकाग्रता जोखीम व्यवस्थापन आणि पतपुरवठा सुविधांशी संबंधित २०२५ च्या नियमांमध्ये मोठे बदल प्रस्तावित करणारी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या प्रस्तावांना अंतिम रूप देण्यापूर्वी २८ ऑगस्टपर्यंत त्यावर सार्वजनिक प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.

या मागे RBI चा उद्देश काय आहे?

रिझर्व्ह बँकेच्या नियामक बदलांमागील मुख्य उद्देश ग्रामीण सहकारी बँकांची आर्थिक स्थिरता मजबूत करणं आहे. ग्रामीण भागातील कर्जदार असलेल्यांना त्यांच्या बदलत्या गरजांना पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक कार्यात्मक लवचिकता देण्यासाठी हे महत्त्वाचं उद्देश समोर ठेवलं आहे. आरबीआयने असा प्रस्ताव दिला आहे की, एकाच प्रतिपक्षाला दिलेले कर्ज बँकेच्या टियर-१ भांडवलाच्या २०% पेक्षा जास्त असू शकत नाही आणि एका समूहाला दिलेले कर्ज कमाल २५% पेक्षा जास्त असू शकत नाही. बँकांनी एक किंवा दोन कॉर्पोरेट संस्थांना प्रमाणापेक्षा जास्त कर्ज देणे टाळण्यासाठी हे केले जात आहे.

गृहकर्जाच्या व्याप्तीचा विस्तार

ग्रामीण भागातील पक्क्या घरांची आणि नूतनीकरणाची वाढती मागणी लक्षात घेता, आरबीआयने गृहकर्जाची मर्यादा देखील वाढवली आहे. ₹10,000 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ग्रामीण बँका आता ₹3 कोटींपर्यंतचे गृहकर्ज मंजूर करू शकतील असा निर्देश देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, आरबीआयने ₹10,000 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकांना गृहकर्जाचा कालावधी आणि स्थगिती ठरवण्याचे अधिकार त्यांच्या संचालक मंडळाकडे सोपवण्यात आले आहेत.

क्षेत्र-विशिष्ट मर्यादा हटवणं

आरबीआयचा आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे बहुतेक क्षेत्रांसाठी क्षेत्र-विशिष्ट कर्ज मर्यादा काढून टाकणं आहे.मात्र रिअल इस्टेट क्षेत्रासाठी या मर्यादा कायम ठेवणे. यामुळे ग्रामीण बँकांना स्थानिक मागणीनुसार कृषी, MSME किंवा स्थानिक व्यवसायांना अधिक कर्ज वितरित करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

कर्जदारांना काय फायदा होईल?

या मसुदा प्रस्तावांमुळे कर्जाच्या नियमांमध्ये तात्काळ बदल होणार नाही; यावर अजूनही चर्चा सुरू आहे. पण जर त्यांची अंमलबजावणी झाली, तर त्यामुळे ग्रामीण सहकारी बँकांना मोठी गृहकर्जे देणे आणि अधिक वैयक्तिकृत कर्ज परतफेडीच्या पद्धती अवलंबणे सोपे होऊ शकते, विशेषतः मोठ्या सहकारी बँकांसाठी ही बाब सहज शक्य होऊ शकते. सहकारी बँकांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण आणि निमशहरी भागांतील कर्जदारांसाठी, या बदलांमुळे भविष्यातील गृह वित्तपुरवठा मिळवणे अधिक सुलभ होऊ शकते आणि कर्जाचे पर्याय अधिक सोयीस्कर बनू शकतात.

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू

Web Title: Rbi on home loans change rules for banks relief crackdown on frauds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Home loan
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI news
  • RBI Rule
  • real estate

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.