Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Trump-Zelensky News :युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला Patriot क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी परवाना देण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे युक्रेनमध्ये Patriot क्षेपणास्त्रांच्या देशांतर्गत उत्पादनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 25, 2026 | 06:30 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनमध्येच तयार होणार Patriot क्षेपणास्त्रे?
  • आधी निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका
  • रशियाविरोधातील हवाई संरक्षणाला मोठी चालना
Trump-Zelensky News :रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या हवाई संरक्षण क्षमतेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला Patriot हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी परवाना देण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय समोर आला. युक्रेनसाठी हा निर्णय हवाई संरक्षण मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

युक्रेनमध्येच तयार होणार Patriot क्षेपणास्त्रे?

झेलेन्स्की यांनी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या विषयावर अंतिम निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनला Patriot क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी आवश्यक परवाने मिळणार आहेत. त्यामुळे भविष्यात युक्रेनमध्येच या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीसाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

युक्रेनला रशियाकडून होणाऱ्या ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढल्यास हवाई संरक्षणासाठी परदेशातील पुरवठ्यावर असलेले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

आधी निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका

Patriot क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी परवाना देण्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. याआधी अमेरिकेकडून या विषयावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ट्रम्प यांनीही या तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिका घेतली होती.

मात्र आता झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या ताज्या बैठकीनंतर परिस्थिती बदलल्याचे सांगितले आहे. परवान्याच्या अटी, कोणत्या प्रकारच्या Patriot क्षेपणास्त्रांचे उत्पादन केले जाईल आणि प्रत्यक्ष उत्पादन कधी सुरू होईल, याबाबतचे सविस्तर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

रशियाविरोधातील हवाई संरक्षणाला मोठी चालना

युक्रेनसाठी Patriot प्रणाली ही रशियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे स्वतःच्या देशात उत्पादन क्षमता उभारण्याची परवानगी मिळाल्यास युक्रेनच्या दीर्घकालीन संरक्षण रणनीतीला त्याचा फायदा होऊ शकतो.

झेलेन्स्की यांनी यापूर्वी सांगितले होते की, आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर युक्रेनमध्ये Patriot उत्पादन सुरू करण्यासाठी साधारण एक ते दीड वर्ष लागू शकते. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पुढील टप्प्यात तांत्रिक सहकार्य, उत्पादनाची तयारी आणि परवान्याच्या अटी यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Trump zelensky news ukraine to gain patriot firepower trump makes the final decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • America news
  • Marathi News
  • Russia Ukraine War
  • ukraine

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
2

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched
3

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
4

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.