Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीचा 1,590 कोटींचा आयपीओ लवकरच खुला होणार; गुंतवणुकदारांना मोठी संधी!

शेअर बाजारात लवकरच एक मोठा आयपीओ धडकणार आहे. रीअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी कल्पतरुने आपल्या 1,590 कोटींच्या आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडे कागदपञे दाखल केली आहेत. त्यामुळे आता गुंतवणुकदारांना या आयपीमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 16, 2024 | 06:06 PM
गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!

गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रीअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी कल्पतरु लवकरच आपला आयपीओ घेऊन येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी तब्बल 1,590 कोटी रूपये उभारणार आहे. कल्पतरू या कंपनीकडून आपल्या आयपीओबाबतची कागदपत्रे भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे आता गुंतवणुकदारांना मोठी संधी असणार आहे.

किती असेल ‘या’ आयपीओचा आकार?

कल्पतरुने सेबीकडे सादर केलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ साधारण 1590 कोटी रुपयांचा असणार आहे. आयपीओतून उभ्या राहिलेले पैसे कंपनी कर्जाची परतफेड आणि कॉर्पोरेट कामांसाठी वापरणार आहे. या आयपीओसाठी कंपनी ऑफर फॉर सेलचा पर्याय न निवडता, संपुर्णपणे 100 टक्के नवीन शेअर जारी करणार आहे. या आयपीओसाठी प्रत्येक शेअरची किंमत ही 10 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हेही वाचा – असे न केल्यास …यावर्षी येणार आर्थिक मंदी; तज्ञांचा अमेरिकेच्या सेंट्रल बॅंकेला इशारा!

कुठे वापरणार कंपनी आयपीओचे कमाई?

कल्पतरु कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेपैकी 1,192.5 कोटी रुपये हे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाणार आहे. जून तिमाही अखेर कंपनीवर एकूण 10,747.69 कोटी रुपये इतके कर्ज होते. मोफ्तराज पी.मुनोत आणि पराग.एम.मुनोत हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.

काय करते ‘ही’ कंपनी

कल्पतरू ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठा ब्रँड आहे. ही कंपनी लक्झरी आणि प्रिमियम प्लॅट्ससाठी ओळखली जाते. या आर्थिक वर्षात कंपनीने अनेक नव्या प्रोजेक्ट्सवर काम चालू केले आहे. सध्या या कंपनीच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. भविष्यातही अनेक प्रकल्पांवर ही कंपनी काम करणार आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात या कंपनीने आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

Web Title: Real estate developer kalpataru ipo of 1590 crores will open soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
1

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट
2

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट

Share Market Today: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात! गुंवतणूकीसाठी ‘या’ स्टॉक्सना द्या प्राधान्य
3

Share Market Today: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात! गुंवतणूकीसाठी ‘या’ स्टॉक्सना द्या प्राधान्य

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
4

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.